जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप धारक यांनी पत्रकारांना पेट्रोल उपलब्ध करून द्यावे

Last Updated by संपादक

बीड/कडा:शेख सिराज―
लॉकडाऊन च्या नवीन नियम नुसार पेट्रोल पंप चालकांना 7 ते 11 सर्वसामान्यांना पेट्रोल देण्याची मुभा आहे त्यानंतर फक्त
अत्यावश्यक सेवांसाठी च पेट्रोल पंप नियमित वेळेत चालू राहतील असे आदेश आहेत.

या काळात पत्रकारांना बातमी संकलनासाठी बाहेर जावे लागत असल्याने वेळेचे बंधन पाळता येत नाही त्याचा विचार करून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश काढून पेट्रोल पंप चालकांनी नियमित वेळेत मान्यताप्राप्त पत्रकारांना सुद्धा पेट्रोल देण्यात यावे असे सांगितले आहे. अहमदनगर येथील सर्व पेट्रोल पंप धारकांनी अधिस्वीकृती पत्रकारांना पेट्रोल उपलब्ध करून देण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहे .

या आदेशात जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील दिलेल्या निर्देशानुसार मान्यताप्राप्त प्रसार माध्यमांच्या सेवा यांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तसेच जिल्हयामध्ये वेळेच्या निर्बंध अस्यामे पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरीता पेट्रोल / डिझेल । सीएनजी/ एलपीजी गॅस विक्री यास सकाळी 07.00 ते सकाळी 11.00 या कालावधीत मान्यता देण्यात आलेली आहे. मान्यताप्राप्त पत्रकारांना बातम्यांचे संकलन, वार्तांकन करणेकामी एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी तसेच त्यांचे वृत्तपत्राचे कार्यालयामध्ये जाणे आवश्यक असते. त्या कारणास्तव मान्यताप्राप्त पत्रकारांना आवश्यकतेनुसार पेट्रोल पंपाच्या नियमित वेळेमध्ये पेट्रोल उपलब्ध करुन दयावे असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पेट्रोल पंप धारकांना दिले आहे.