एस टी चालक नाथा वाडेकर सेवानिवृत्त

Last Updated by संपादक

कडा:शेख सिराज―
‌‌आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील रहिवाशी तसेच आष्टी डेपो येथे कार्यरत असलेले नाथा ठकन वाडेकर हे आज दि 30 रोजी 25 वर्षे सेवा करून सेवा निवृत्त झाले. अधिक माहिती अशी की, सुलेमान देवळा येथील नाथा ठकण वाडेकर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये चालक म्हणून भर्ती झाले. आष्टी डेपो मध्ये 1995 साली चालक म्हणून रुजू झाले होते.त्यांनी सलग 25 वर्षे विना अपघात सेवा केल्याने त्यांना सुरक्षित सेवा पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते.अतिशय शांत संयमी स्वभावाचे नाथा वाडेकर आबा नावाने सर्व लहान थोरांचे परिचित.राज्य परिवहन महामंडळात 25 वर्ष सेवा करून आज दि 30 एप्रिल रोजी सेवा निवृत्तीचा छोटेखानी कार्यक्रम आष्टी डेपो मध्ये करण्यात आला.यावेळी डेपो मॅनेजर संतोष डोके यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी सहाय्यक वाहतूक बबन गायकवाड खोत साहेब वाहतूक नियंत्रक संजय निंबाळकर नंदकुमार जाधव कामगार संघटनेचे अध्यक्ष सुभाष गुंड, मुटकुळे आदि उपस्थित होते.