‘अनुभवातून शिक्षण’ कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय काकडीचे विक्रमी उत्पादन
अंबाजोगाई: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत,अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांच्या निर्देशानुसार विविध शैक्षणिक व शिक्षण पूरक उपक्रम राबवले जातात.
महाविद्यालयातील विद्यार्थी भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे प्रात्यक्षिक स्वतः करतात व सदरील उत्पादनाची विक्रीही विद्यार्थीच करतात.त्यातून त्यांना प्रत्यक्ष उत्पादन,विक्री, व्यवहार ज्ञान याचा अनुभव मिळतो.त्याच अनुषंगाने कृषि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ‘अनुभवातून शिक्षण’ या संकल्पनेतून पशुसंवर्धन विभागाचे मोड्यूल प्रभारी डॉ.नरेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुग्धजन्य पदार्थाचे (खवा,पनीर) यांचे उत्पादन घेऊन विक्री केली.तसेच उद्यानविद्या शाखेचे डॉ.अरूण कदम व डाॅ.बसवलिंगआप्पा कलालबंडी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सेंद्रिय काकडीचे भरघोस व विक्रमी उत्पादन घेतले.व त्याची विक्रीही विद्यार्थ्यांनीच शासकीय कोविड नियमांचे पालन करून महाविद्यालय नजीकच्या वसाहतीत जाऊन २०/ रूपये प्रति किलो दराने केली.काकडी लागवड ते उत्पादन या कालावधीत डॉ.नरेंद्र काळे,ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ कुलकर्णी,पं.उद्धव बापू अपेगावकर,राजेसाहेब देशमुख,राहुल सोनवणे आदी मान्यवरांनी वेळोवेळी भेटी दिल्या आहेत.सोयाबीन,रब्बी ज्वारी या बिजोत्पादनाबरोबरच विविध जातीचे आंबे व विविध जातीच्या चिंचाचे विक्रमी उत्पादन घेण्यात आले आहे.कृषिचे विद्यार्थी भविष्यात कुशल नवउद्योजक तयार व्हावेत व त्यातून त्यांच्या अंगी स्वावलंबन यावे हा उद्देश या उपक्रमातून साध्य होतो.पत्रकार संतोष बोबडे,पत्रकार संतोष केंद्रे,पत्रकार देविदास जाधव यांनी प्रकल्पास भेट देऊन विद्यार्थ्याकडून काकडी खरेदी केली व त्यांना प्रोत्साहीत केले.यावेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे,डॉ.अरूण कदम व डाॅ.प्रताप नाळवंडीकर यांची उपस्थिती होती.काकडी लागवड,तंत्रज्ञान व उत्पादन घेण्यासाठी,दत्ता मुजमुले,पियुष पंचभाई,गणेश लहूडकर,शुभम हेळमकर,ऋषिकेश बादाडे,अक्षता जाधव,श्रद्धा राठोड, पल्लवी खैरे,वैष्णवी मेंगडे,अमृता शेगडे, ज्ञानेश्वरी झोल,शुभांगी गवळी व इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.