टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष उमेशभाऊ पोखरकर यांच्या वाढदिवसानिमित्त लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयास अत्यावश्यक साहित्याची भेट

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:येथील उमेशभाऊ पोखरकर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार,दिनांक ४ मे रोजी टायगर ग्रुप अंबाजोगाईच्या वतीने लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयास मदत म्हणून अत्यावश्यक साहित्य भेट देण्यात आले.

टायगर ग्रुप हा सातत्याने सामाजिक बांधिलकीतून कार्य करतो.गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप करणे,अतिवृष्टी,पूर,भूकंप आदी विविध नैसर्गिक आपत्तीच्या व संकटकाळात टायगर ग्रुप हा नेहमीच समाज व प्रशासनाच्या मदतीला तत्परतेने धावून जातो.हे आपणांस माहीत आहे.टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष उमेशभाऊ पोखरकर यांचा ४ मे रोजी वाढदिवस होता.त्या निमित्त टायगर ग्रुप, अंबाजोगाई आणि मिञ परीवाराच्या वतीने लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयातील वैद्यकीय सेवेसाठी मदत म्हणून तसेच रूग्णालयासाठी आवश्यक असणारे विविध अत्यावश्यक साहित्य भेट म्हणून देण्यात आले.यात बी.पी.अपरेटस-१०,
पल्सॉक्सिमीटर-१०,
ग्लुकोमिटर-१०,
डायनाप्लास्ट-१०,
डस्टबीन-३०,मास्क-२०० व इतर साहित्याचा समावेश आहे.सदरील साहित्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रकांत चव्हाण यांनी स्विकारले.यावेळी बोलताना डॉ.चव्हाण यांनी लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयास अत्यावश्यक साहित्य भेट दिल्याबद्दल टायगर ग्रुपचे आभार मानले.या प्रसंगी डॉ.सचिन पोतदार,उमेश भाऊ पोखरकर, संतोष भाऊ डागा, दिपकआप्पा लामतुरे, स्वप्निल सोनवणे, बालाजी रुद्राक्ष, तिरूपती राठोड, कृष्णा नरसिंगे, महादेव मोरे,अक्षय धारेकर,आदित्य देशमुख,दिपक पवार, गजानन गुजर,सुशांत शिंदे (सांगली) आदींची उपस्थिती होती.सदरील उपक्रमाच्या यशस्वितेसाठी टायगर ग्रुपच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.