पुण्यतिथीनिमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अभिवादन

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक सुधारणेतून सर्व घटकांना न्याय व विकासाची संधी दिली-राजकिशोर मोदी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरूवार,दिनांक ६ मे रोजी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे वतीने अभिवादन करण्यात आले.

अंबाजोगाईतील सहकार भवन हॉल येथे गुरूवार,दिनांक ६ मे २०२१ रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आहे.यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या लोककार्याचे स्मरण करताना मोदी म्हणाले की,’सामाजिक न्यायाच्या,आरक्षणाच्या संकल्पनेचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे नेण्याची ताकद आहे.आम्ही देखिल मागील अनेक वर्षांपासून राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवरच कार्य करीत आहोत,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी आहे.त्या निमित्तानं शाहू महाराजांना अभिवादन करताना मोदी म्हणाले की,’शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचे आदर्श राज्य निर्माण केले.सक्तीचे शिक्षण दिले,दुर्बल घटकांना आरक्षण दिले, पायाभूत सुविधांची निर्मिती केली, क्रांतिकारी सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय व विकासाची संधी दिली.समाजातील सर्व घटकांसाठी शिक्षणाची व्यवस्था केली.विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये,शाळा,वसतिगृहे बांधली.शेतक-यांसाठी धरणे बांधली.समाजाची गरज ओळखून बाजारपेठा निर्माण केल्या.बहुजनांना शिक्षण दिले,जातिभेद निर्मूलन केले,नोक-यांमध्ये आरक्षण दिले,स्त्री मुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे लोककल्याणकारी राजे आणि क्रांतिकारी विचारांचे थोर समाजसुधारक होते असे ते म्हणाले. ‘शाहू महाराजांनी महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार पुढे नेला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्ववंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत करून प्रोत्साहन दिले. तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा,अस्पृश्यता,अनिष्ट प्रथा,रूढी, परंपरांना विरोध करून बंदी घातली. आंतरजातीय विवाहासाठी कायदा तयार केला,शैक्षणिकदृष्ट्या बहुजनांच्या उद्धारासाठी सतत कार्य केले,वेळोवेळी सामाजिक समतेचा पुरस्कार केला,आयुष्य भर अनिष्ट रूढी-परंपरांना प्रखरतेनं विरोध केला अशा लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली अशा शब्दांत राजकिशोर मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी नगरसेवक धम्मपाल सरवदे,राजीव गांधी पंचायतराज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,भारत जोगदंड,सहशिक्षक विजय रापतवार,अमोल मिसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.