ऑक्सिजनच्या टंचाईवर मात करण्यासाठी सोयगाव तहसीलदारांचा वृक्ष लागवडीकडे कल, तहसील कार्यालयापासून प्रारंभ

Last Updated by संपादक

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जिल्हाभरात ऑक्सिजनची टंचाई भासत असून कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेवर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याचे चित्र जिल्हाभरात असतांना नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीच्या प्रयोगाकडे सोयगाव तहसीलदार प्रवीण पांडे यांनी आगेकूच केली असून या उपक्रमाची सुरुवात सोयगाव तहसील कार्यालयापासून करण्यात आली आहे.यासाठी तालुकाभर भ्रमंती करून वृक्ष लागवडीचा संदेश देवून नैसगिक ऑक्सिजन निर्मितीचा प्रयोग राबविणार असल्याचे तःस्दिलदार प्रवीण पांडे यांनी बुधवारी सांगितले.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे.परंतु कृत्रिम ऑक्सिजनचीही टंचाई निर्माण झाली असतांना सोयगाव तहसीलदार प्रवीण पांडे यांनी ऑक्सिजनची टंचाई भासू नये यासाठी थेट सोयगाव तहसील कार्यालयाच्या लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे जतन करून त्यांची वृद्धी वाढविण्यासाठी एक पावूल पुढे सरसावले असून सोयगावला पहिला नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीची योजना उभारण्याचा संकल्प वृक्ष लागवडीतून केला आहे.खुद्द तहसीलदार प्रवीण पांडे यांनी लॉकडाऊन मध्ये शासकीय कामांची मंदी आल्याने सोयगाव तहसील कार्यालयातील जुन्या व बंद झालेल्या कुपनलिका सुरु करून या कुप्नालीकांच्या पाण्यावर सोयगाव तहसील कार्यालयातील फोरेस्ट वाढविण्यासाठी एक हात पुढे केला आहे.बुधवारी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी स्वतः बागेत फिरून वृक्षांची काळजी घेत त्यांच्या वाढीसाठी या वृक्षांची जतन करण्यासाठी मशागत केली यासाठी महसूल कर्मचाऱ्यांची फौजही तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या दिमतीला होती.सोयगाव तहसील कार्यालयात घनदाट फोरेस्ट तयार करून नैसर्गिक ऑक्सिजन नर्मिती यंत्रणा उभारण्याचे काम तःसिल्सदार प्रवीण पांडे यांनी हाती घेतली असल्याने सोयगाव तहसील कार्यालयात आता येणाऱ्या अभ्यागतांना मात्र शुद्ध हवा मिळणार आहे.

तालुक्यातही उपक्रम राबवू-

सोयगाव तहसील कार्यालयात नैसर्गिक ऑक्सिजन यंत्रणा यशस्वी झाल्यावर तालुक्यातही ग्राम पंचायतीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीतून तालुकावासीयांना शुद्ध हव देण्याचे कार्य करणार असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.