सोयगाव तालुक्याला मिळाले लासिंचे डोस ,आजपासून होणार सुरळीत लसीकरण

Last Updated by संपादक

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव ग्रामीण रुग्णालयासह तालुक्याला कोविड लसीकरणाचे ६० व्हायाल रात्री उशिरा प्राप्त झाले आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील पाचही लसीकरण केंद्रांवर गुरुवारी(ता.सहा)पासून ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी दिली आहे.

सोयगाव तालुक्याला जिल्हा पुरवठा विभागाकडून सोयगाव,जरंडी,बनोटी आणि सावळदबारा या चार ठिकाणी प्रत्येकी १५ याप्रमाणे लसींचे व्हायल प्राप्त झाले आहे त्यामुळे गुरुवार पासून सोयगाव तालुक्यात पाच लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु होणार आहे.४५ वर्षावरील नागरिकांनाच प्राधान्य देण्यात येणार असून त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर कसबे,वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन काळे यांनी केले आहे.

अठरा वर्षावरील लाभार्थ्यांचे शुक्रवार पासून जरंडी केंद्रावर लसीकरण-

अठरा वर्षावरील लाभार्थ्यांना तालुक्यात एकमेव जरंडीच्या लसीकरण केंद्रावर शुक्रवार पासून लसीकरण करण्यात सुरु करण्यात येणार आहे त्यासाठी गावनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्र जरंडी यांच्या वतिने हाती घेण्यात आले असून तालुक्यात पहिल्यांदा जरंडीला अठरा वर्षावरील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी ५० व्हायल कोव्ह्क्सीनचे प्राप्त झाल्या असल्याने अठरा वर्षावरील लाभार्थ्यांना जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावातील लाभार्थ्यांसाठी लसीकरण करण्यात येईल असेही डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी सांगितले.