कड्यातील मोफत कोव्हिड सेंटर मध्ये नास्टा व अंडीचे वाटप

Last Updated by संपादक

कडा:शेख सिराज―
सध्याची परिस्थिती पाहता जगासमोर कोव्हिड१९ कोरोनाचे फार मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या गोष्टीचा विचार करून आज बरेच हात मदतसाठी पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. आष्टी तालुक्यातील कडा येथे अंबेश्वर आरोग्य मंदिर मोफत कोव्हिड सेंटर आमले बंधु यांनी सुरु केले आहे. या कोव्हिड सेंटर मध्ये आज सकाळचा नास्टा व उकडलेले अंडीचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रा.प.सदस्य प्रमोद (बंटी) गायकवाड,अमोल आमले,मा.उपसभापती दिपक कर्डिले,अंबादास ढोबळे,नवनाथ ढोबळे,धनंजय मुथ्था,पत्रकार रहेमान सय्यद आदि उपस्थित होते.