कडा:शेख सिराज―
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना लसीकरणासाठी लवकर आपला नंबर यावा म्हणून पहाटपासुनच लागतात रांगा
याअगोदर ग्रामिण भागातील लोकांना लसीकरणा बाबत जनजागृती नसल्याने किंवा मनात भिती असल्यामुळे प्राथ.आरोग्य केंद्रात लस यायची पण लोक येत नव्हते आता लोक येतात तर लस कमी प्रमाणात येत अशे आलेली लस संपली की उर्वरित लोकांना व्हायची चक्कर आता लसीचे प्रमाण वाढले तर आरोग्य विभागाचे काम बंद अंदोलनामुळे हजारो लोकांचा झाला हिरमुड.यामध्ये कित्येक अबालवृध्द,अपंग महिला पुरूषांना झाला हकनहाक ञास या पीएससी अंर्तंगत जवळ जवळ ४४गावे येत असल्याने येणाऱ्या लोकांची संख्याही जास्तच असते.
प्रशासकीय यंञनेतील एका कर्मचाऱ्यांच्या चूकीमुळे सर्वसामान्य जनतेची होणारी हेळसांड व त्यांना वेठीस धरने कितपत योग्य आहे अशा शवाल सर्वसामान्य नागरिकांन कडून होतोय.हेच नागरिक सर्व प्रशासकीय यंञनेला देवदूत मानतात.आपल्या मनात त्यांच्या बद्ल आदर ठेवतात.परंतु आज ह्याच लोकांच्या मनात रोष दिसून आला.लसीकरणासाठी आलेल्या लोकांची समजुत सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर घोडके यांनी काढली लोकांना आपआपल्या घरी जाण्याची केली विनंती.
चर्हाटाफाटा येथिल घटनेचा व तालुक्यातील लसीकरणावेळी कामबंद अंदोलन या दोन्हीही घटणेचा सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांनी केला जाहीर निषेध.