जनतेचे जीव वाचविण्यासाठी बीड जिल्ह्यात कार्यक्षम प्रशासनाची गरज ; सत्ताधा-यांनी दखल घ्यावी -भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
बीड जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा उद्रेक थांबायला तयार नाही.आज बारा हजार पेक्षा अधिक रूग्ण ॲक्टीव्ह आहेत.40% वर पॉझिटिव्ह रेट असून मृत्यूचे प्रमाण ही सातत्याने वाढत आहे.बेड,ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन आदी प्रश्न चव्हाट्यावर असून आरोग्य यंत्रणा कोलमडून गेलेली दिसून येत आहे.जिल्हा प्रशासन निष्क्रीय असून नियोजन आणि यंत्रणेवर नियंत्रण नाही.भयानक संकटातून जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या जिवाच रक्षण करण्यासाठी कार्यक्षेम तथा सक्षम प्रशासनाची गरज असल्याचे भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.सत्ताधा-यांनी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी तात्काळ बदल करावा अशी मागणी त्यांनी केली.

या पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि देशात कोरोनाचा सुरूवातीला मार्च 2020 मध्ये जेव्हा या महामारीचा उद्रेक झाला.त्यावेळी बीड जिल्ह्यात कोरोना नव्हता.मराठवाडयात सर्वांत कमी रूग्ण जिल्ह्यात होते.त्याचे मुळ कारण प्रशासन सक्षम होते.यापूर्वीचे जिल्हाधिकारी राहूल
रेखावार,तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांची आठवण आज जनतेला येत आहे.वर्तमान परस्थितीत करोनाचा उद्रेक झाला असून संपूर्ण जिल्ह्यात भयानक परस्थीती निर्माण झाली आहे.मृत्यूचे प्रमाण खुप असून दररोज हजार ते दीड हजारांपर्यंत आकडा कमी होण्याचे नांव घेत नाही.ऑक्सिजनची कमतरता आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा सावळा गोंधळ आहे.लसीकरण डोसचे नियोजन सुव्यवस्थीत नसून जनावरा प्रमाणे पोलिस सामान्य लोकांना बेदम मारहाण करत आहे बीड मध्ये डॉ.विशाल वनवे यांना बेदम मारहाण करण्याची घटना घडली.एवढेच नाही तर नुकतेच एका टेम्पोत 22 मृतदेह कोंबून मृतांची अवहेलना केलेले प्रकरण देशात नव्हे तर परदेशात ही गाजले.या सर्वांचे मुळ म्हणजे जिल्हा प्रशासन सक्षम नाही.आणिबाणी काळात निर्णय घेण्याची क्षमता असणा-या प्रशासनाची गरज बीड जिल्ह्याला आहे.ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुर्वउपाय केले नाही अजून प्रशासन ग्रामीण भागात पोहचले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.संपूर्ण जिल्हयात आरोग्य यंत्रणेवर नियंत्रणाचा अभाव आहे.प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजन मागणी नुसार पुरवठा करण्याची तत्परता जिल्हा प्रशासनाची असते त्या विषयात प्रशासन कमी पडत आहे.जिल्हाभरात यंत्रणेवर नियंत्रण नाही त्याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहे.बीड जिल्ह्यातील तमाम जनतेच्या जिवाच रक्षण करण्यासाठी.वाढता कोरोना रोखण्यासाठी सत्ताधा-यांनी जिल्ह्यात सक्षम जिल्हा प्रशासन व आरोग्य अधिकारी आणावेत आशी मागणी त्यांनी केली आहे वेळीच बदल केला नाही तर यापेक्षा ही अधिक परिणाम लोकांना भोगावे लागतील असे त्यांनी म्हटले आहे.