अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने सामाजिक कार्यात मोलाचे कार्य करणा-यांना व कोरोना योध्यांना “महात्मा बसवेश्वर सेवा सन्मान पुरस्कार-२०२१” प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी दिली आहे.
पुरस्कार विजेत्यांमध्ये पुढील मान्यवरांचा समावेश आहे.अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर,अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक स्वाती भोर,अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे, समाजसेवक अनिकेतजी लोहिया, समाजसेवक प्रसाददादा चिक्षे, कोरोना योद्धा डॉ.विशाल लेडे, अधिक्षक डॉ.अरूणा केंद्रे,डॉ.चंद्रकांत चव्हाण,डॉ.नागेश, डॉ.ईरा ढमढेरे,डॉ. विनय नाळपे (शासकीय रक्तपेढी विभाग), सामाजिक कार्यकर्ते शेख मुख्तार,मल्हारी जोगदंड (स्वच्छता विभाग,न.प.अंबाजोगाई) या मान्यवरांना शुक्रवार,दिनांक १४ मे रोजी महात्मा बसवेश्वर जयंती दिवशी कोविड नियमांचे पालन करीत पुरस्कार विजेत्यांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप- सन्मानचिन्ह,ग्रंथ,पुष्पगुच्छ व शाल असे आहे.या बाबत बोलताना पोखरकर म्हणाले की,मागील एक वर्षापासून कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर स्वता:चा जीव धोक्यात घालून एक कोरोना योध्दा म्हणून सामाजिक बांधिलकीतून समाजातील बाधित रूग्ण यांना व्याधिमुक्त करण्याचे व त्यांचे प्राण वाचवून रूग्णाच्या नातेवाईक यांना धीर देण्याचे अनमोल कार्य पुरस्कारासाठी निवडलेल्या मान्यवरांकडून होत आहे.त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे.या सामाजिक कार्याची नोंद घेवून निवड समितीने सदरील पुरस्कारासाठी मान्यवरांची निवड केली आहे.महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती ही सामाजिक बांधिलकीतून मागील अनेक वर्षांपासून कार्य करीत आहे. दरवर्षीच आम्ही विविध लोकोपयोगी उपक्रम राबवित आहोत.तसेच दरवर्षी समाजातील शेवटच्या माणसासाठी नि:स्पृहपणे कार्य करणारांना पुरस्कार देऊन सन्मानित करते.यावर्षी सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या मान्यवरांकडून आम्हाला आशिर्वाद व या पुढील काळात ही लोकसेवा करण्यासाठी ऊर्जा मिळेल.या अपेक्षेसह महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती, अंबाजोगाईचे अध्यक्ष विनोद सिद्रामआप्पा पोखरकर यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
==================