महाराष्ट्र शासनाची मोफत गहु-तांदुळ योजना कागदावरच ग्रामस्थांची उपासमार – डाॅ.गणेश ढवळे

Last Updated by संपादक

बीड:नानासाहेब डिडुळ― महाराष्ट्र शासनाने गरीब व गरजु लोकांना लाॅकडाऊन कालावधीत जाहीर केलेले धान्य स्वस्त धान्य दुकानावर उपलब्ध करून गरीब जनतेची उपासमार होऊ नये यासाठी केलेली घोषणा आठवडा उलटला तरी कागदावरच असून गोडाऊन मधुन धान्यच आले नसल्यामुळेच वाटप करण्यात आले नसल्याचे स्वस्त धान्य दुकानदारांनी बोलुन दाखवले, गोडाऊन किपर आज-ऊद्या करत लांबन लावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून तात्काळ गोडाऊन मधूनच धान्य वितरीत करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा आधिकारी बीड यांना तालुका पुरवठा आधिकारी, तहसिलदार बीड यांच्या मार्फत डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.

कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन झालेल्या जनतेला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने रेशन दुकानावर 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ प्रतिव्यक्ती देण्याचे जाहीर करून आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटुन गेला आहे तरी सुद्धा अद्याप ग्रामिण भागामध्ये धान्य रेशन दुकानावर आलेले नाही, रेशन दुकानदारांच्या मते अजून गोडाऊन मधूनच धान्य आले नाही, आल्यानंतर वाटप करू.
बीड तालुक्यातील मौजै लिंबागणेश येथे एकुण 3 स्वस्तधान्या दुकाने असून एकुण 700 च्या आसपास राशनकार्ड आहेत. चौसाळा येथील गोडाऊन मधून त्यांना धान्य वाटप होते, परंतु चौसाळा गोडाऊन किपर आज ऊद्या वाटप करू म्हणत आठवडा उलटून गेला असुन सध्या संचारबंदीच्या काळात ग्रामस्थांची उपासमार होत असून तात्काळ पुरवठा स्वस्त धान्य दुकानदारांना करण्यात यावा,अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी ईमेलद्वारे केली आहे.