Newsअंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

मराठवाड्यात आवकाळी पावसाचा धुमाकूळ ,पंचनामे करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ ५० हजार रूपये हेक्टरी मदत करावी ―प्रवक्ते राम कुलकर्णी यांची मागणी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोना संकटाच्या पाठोपाठ मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकरी उध्वस्त होऊ लागला आहे.आंबा,डाळिंब, फळबागा आदींचे प्रचंड नुकसान झाले.ठाकरे सरकारचे अधिकारी पंचनामे सुद्धा करायला तयार नसून एकीकडे कोरोना तर दुसरीकडे अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.शेतक-यांवर संकट आले असताना मराठवाड्यातले मंत्री कुठे बिळात लपले असा सवाल करत नुकसानग्रस्त शेतक-यांना तात्काळ ५० हजार रूपये हेक्टरी मदत करावी अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.

प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,मागच्या दहा दिवसांपासून मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.धो-धो पाऊस पडतो.चक्रीवादळ आल्यासारखा वारा येतो.अनेक ठिकाणी गारा पण,पडल्या ज्यामुळे आंबा,डाळिंब,मोसंबी या सारख्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले.वीज पडून अनेक शेतक-यांचा जीव गेला काही ठिकाणी जनावरे ही मेली.तर शेतीत असलेल्या घरांचे पत्रे उडून गेली.लातुर,बीड,नांदेड,उस्मानाबाद,परभणी,हिंगोली या जिल्ह्याला आवकाळी पावसाने वेढले.अशा संकटात सत्ताधारी मंत्री माञ कुठे बिळात लपले कळत नाही.कालच्या रविवारी बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यात अवकाळी प्रचंड पाऊस पडला भर उन्हाळ्यात नदीला महापूर आल्यासारखे स्वरूप निर्माण झालं.या चक्रीवादळात शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले असून एकीकडे कोरोना तर दुसरीकडे अवकाळी पाऊस या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.राज्यातील ठाकरे सरकारला शेतक-यांचे दुःख दिसत नाही असा आरोप राम कुलकर्णी यांनी केला.शेतक-यांच्या नुकसानीचे साधे पंचनामे करायला सुद्धा सरकारचे अधिकारी जात नाहीत हे फार मोठे दुर्दैव आहे.या सरकारने वास्तविक पाहता तात्काळ पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतक-यांना हेक्‍टरी ५० हजार रूपयांची मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.रोज पडणा-या पावसाने खरीपाच्या शेती कामावरही परिणाम झाले आहेत.पाऊस आणि चक्रीवादळ हे फार मोठं संकट असून सरकारने दुर्लक्षित करता कामा नाही असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.