अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय रूग्णालय व लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयास अत्यावश्यक साहित्य भेट

-प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा रापतवार यांची माहिती

अंबाजोगाई (वार्ताहर): अंबाजोगाई शहरातील शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय रूग्णालय व लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयास रूग्णसेवेसाठी अत्यावश्यक असलेले साहित्य सोमवार आणि मंगळवार रोजी भेट देण्यात आले आहे.अशी माहिती शिक्षक मैञी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा रापतवार यांनी दिली आहे.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा रापतवार यांनी याबाबत सांगितले की,प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील महिन्यांत सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सदरील कोविड स्मशानभूमी मध्ये ५०० लीटर पाणी साठवणूक करण्याची क्षमता असलेली पाण्याची टाकी बसविण्यात आले.तसेच प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार,दिनांक ११ मे २०२१ रोजी लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरला ६ ऑक्सीमीटर भेट देण्यात आले.सदरील साहित्य डॉ.चंद्रकांत चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी स्विकारले तत्पूर्वी सोमवार,दिनांक १० मे २०२१ रोजी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयास रूग्ण वाहून नेण्याच्या ४ ट्रॉली, ४ सिमेंट बाकडे, १ पिण्याच्या पाण्याचे मिनी वॉटर कुलंट इत्यादी रूग्णसेवेसाठी अत्यावश्यक साहित्य भेट देण्यात आले.सदर साहित्य स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे व कोविड विभागाचे प्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार यांना पंचायत समिती अंबाजोगाईचे गटविकास अधिकारी डॉ.संदीप घोणसीकर,गटशिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी,प्रा.प्रशांत जगताप,जि.प.मा.शाळा राडीचे मुख्याध्यापक तानाजी देशमुख,शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे मुख्य मार्गदर्शक विष्णू सरवदे,प्रतिष्ठानचे सदस्य वैजेनाथ अंबाड,गणेश तरके, महादेव मिसाळ,समाधान धिवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.या प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राकेश जाधव उपअधीक्षक डॉ.विश्वजीत पवार, सर्जरी विभागप्रमुख डॉ.नितीन चाटे,न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे डॉ.प्रमोद दोडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार,उपाध्यक्ष अनुरथ बांडे,सचिव उमेश नाईक,कोषाध्यक्ष दत्ता देवकते,बाळासाहेब माने,संदीप दरवेशवार,विष्णू गंगणे,महेश वेदपाठक,प्रताप चिंतामणी यांचेसह रूग्णालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी 'शिक्षक-मैत्री' प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणा-या सदरील कार्याची रूपरेषा विषद करताना शिक्षक मैञी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा रापतवार यांनी याबाबत सांगितले की,प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील एक वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटूंबिय यांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.दिव्यांग बांधवांना सहकार्य करण्यात आले.शासकीय कार्यालयात सॅनिटायझर संयञ व हात धुण्यासाठी पाण्याची टाकी देण्यात आली.परराज्यातील मजूर व कुटूंबिय यांना सर्वोतोपरी मदत करण्यात आली.अटल घन वन प्रकल्पासाठी पुढाकार घेण्यात आला.शिक्षक बांधवांच्या विविध प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच समाजातील विविध घटकांना बांधिलकीतून सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगून सदरील साहित्य भेट देण्यासाठी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व अंबाजोगाई परळी तालुक्यातील शिक्षक मित्रांचे मोलाचे योगदान लाभले असल्याची माहिती विजयदादा रापतवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

सामाजिक बांधिलकीतून प्रतिष्ठानचे कार्य
====================
यापुढील काळात ही शिक्षक मैञी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतील.हे कार्य अखंडित सुरू राहील,या सोबतच विविध उपक्रम व शिक्षकांच्या प्रश्नांवर यापुढे ही काम करील.कोविड पार्श्वभूमीवर प्रत्येकाने नियमीत मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा,गर्दीत जाणे टाळावे,नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

-विष्णू सरवदे (मुख्य मार्गदर्शक,शिक्षक मैञी प्रतिष्ठान,अंबाजोगाई.)