टायगर ग्रुपकडून स्वा.रा.ती.रूग्णालयाच्या कोविड वॉर्डास कुंड्या व रोपांची भेट – उमेशभाऊ पोखरकर

जगतज्योती महात्मा बसवेश्‍वर आणि छञपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त

अंबाजोगाई (वार्ताहर):
येथील टायगर ग्रुप अंबाजोगाईच्या वतीने महात्मा जगतज्योती महात्मा बसवेश्‍वर आणि छञपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार,दिनांक १४ मे रोजी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या कोविड वॉर्डात कुंड्या व रोपे भेट म्हणून दिली आहेत.यापूर्वीही त्यांनी लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयास मदत म्हणून अत्यावश्यक साहित्य भेट देण्यात आले असल्याची माहिती मराठवाडा अध्यक्ष उमेशभाऊ पोखरकर यांनी दिली आहे.

टायगर ग्रुप हा सातत्याने सामाजिक बांधिलकीतून कार्य करतो.गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप करणे,अतिवृष्टी,पूर,भूकंप आदी विविध नैसर्गिक आपत्तीच्या व संकटकाळात टायगर ग्रुप हा नेहमीच समाज व प्रशासनाच्या मदतीला तत्परतेने धावून जातो.हे आपणांस माहीत आहे.टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष उमेशभाऊ पोखरकर यांनी नुकतेच ४ मे रोजी आपल्या स्वता:च्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप,अंबाजोगाई आणि मिञ परीवाराच्या वतीने लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयातील वैद्यकीय सेवेसाठी मदत म्हणून तसेच रूग्णालयासाठी आवश्यक असणारे विविध अत्यावश्यक साहित्य भेट म्हणून देण्यात आले.त्यानंतर नुकतेच उमेशभाऊ पोखरकर यांनी महात्मा जगतज्योती महात्मा बसवेश्‍वर आणि छञपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वाराती रूग्णालयातील कोविड वॉर्डात कोविड वॉर्डात रोपे लावलेल्या कुंड्या ठेवल्या तर वॉर्डातील रूग्णांना काहीसे बरे वाटेल या विधायक भूमिकेतून पोखरकर यांनी जगतज्योती महात्मा बसवेश्‍वर आणि छञपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुंड्या व रोपे भेट दिली आहेत.त्यांचा स्विकार स्वारातीचे कोविड विभागप्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार व सहकारी यांनी केला.यावेळी बोलताना डॉ.बिराजदार यांनी स्वारातीच्या कोविड वॉर्डात कुंड्या व रोपे भेट दिल्याबद्दल टायगर ग्रुपचे आभार मानले.या प्रसंगी उमेश भाऊ पोखरकर,संतोष भाऊ डागा,दिपकआप्पा लामतुरे,स्वप्निल सोनवणे,बालाजी रुद्राक्ष,तिरूपती राठोड,कृष्णा नरसिंगे, महादेव मोरे,अक्षय धारेकर,आदित्य देशमुख,दिपक पवार, गजानन गुजर आदींची उपस्थिती होती.सदरील उपक्रमाच्या यशस्वितेसाठी टायगर ग्रुपच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.