ब्रेकिंग न्युज

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीकडून महापुरूषांना अभिवादन व उत्सवानिमित्त शुभेच्छा

अंबाजोगाई (वार्ताहर):
जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती,छत्रपती संभाजी महाराज जयंती,भगवान परशुराम जयंती तसेच अक्षय तृतीया आणि रमजान ईदच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील सर्व जनतेस मंगलमय व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देत बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून महापुरूषांना अभिवादन करण्यात आले.घरी रहाल तर कोरोना संकटकाळात सुरक्षित रहाल तसेच आपली व परीवाराची काळजी घ्यावी असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी जनतेला केले आहे.

येथील सहकार भवन हॉल येथे शुक्रवार,दिनांक १४ मे रोजी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती,छत्रपती संभाजी महाराज जयंती,भगवान परशुराम जयंती यांचे प्रतिमापूजन करून अक्षय तृतीया,रमजान ईदच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील सर्व जनतेस मंगलमय व निरोगी आयुष्यासाठी व सर्व बंधू भगिनींना १४ मे या आजच्या वैशिष्ट्यपूर्ण दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की,१२ व्या शतकामध्ये भारतीय समाज विशेष करून दक्षिण भागातील समाज हा अनेक परंपरा,रूढी, अंधश्रद्धा,कर्मकांड, विषमता,भेदभाव,स्त्री दास्यत्व,जातीयता इत्यादींनी त्रस्त झालेला व मरगळलेला होता.अशा परिस्थितीत त्या काळात समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे धाडस जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी केले.त्यांनी तत्कालीन प्रस्थापितांविरूद्ध मोठा संघर्ष उभा केला.महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक,साहित्यिक,शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज प्रवर्तनवादी युगपुरूष,एक महान तत्त्वज्ञानी,समाजप्रबोधक,प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्म संस्थापक होते.महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती.त्यांनी शोषण,भेदभाव,जाती भेदा,श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढलीच नाही.तर ती यशस्वी करून दाखवली.तसेच छञपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवला,स्वराज्य रक्षक,ज्ञानवंत,प्रज्ञावंत किर्तीवंत,शिलवंत,संस्कृत पंडीत,शुरवीर छत्रपती संभाजी महाराजांनी वेळोवेळी विद्याभ्यास, शस्त्रविद्या,राज दरबारातील कारभार, युद्धविद्या,सैन्याचे नेतृत्व या सर्वच बाबींमध्ये आपले कौशल्य दाखवून दिले,त्यांनी अल्पावधीतच रयतेचे आणि स्वराज्याचे मन जिंकून घेतले.अशा कर्तबगार महापराक्रमी,कर्तृत्ववान राजास जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन.! अशा शब्दांत राजकिशोर मोदींनी गौरव केला.या प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,धम्मपाल सरवदे,सुनिल व्यवहारे,विजय रापतवार,सचिन जाधव,अमोल मिसाळ,प्रताप देवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.