अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
सध्या सामाजिक बांधिलकीतून उपक्रम राबविण्याकडे आजच्या तरूणाईचा कल वाढला आहे.शहरातील योगेश माने यांनी बांधिलकी जोपासत गरजूंना भोजन आणि मानवलोक येथील कोविड सेंटर येथे नाष्टा वाटप केले.तसेच वृक्षारोपण ही करण्यात आले.
अंबाजोगाईतील युवक योगेश भैय्या माने याने आपल्या वाढदिवसानिमित्त नुकतेच शहरातील लोकनेते यशवंतराव चव्हाण चौक,संत भगवानबाबा चौक,बस स्टँड,नवा मोंढा आदी विविध भागातील गरजूंना भोजन आणि मानवलोक येथील कोविड सेंटर येथे चहा,बिस्किट असा नाष्टा वाटप केले.तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकिय रूग्णालय परीसरातील फ्लॉवर्स क्वार्टर येथे १२ विविध प्रकारची वृक्ष रोपे याची लागवड करून वृक्षारोपण केले,वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता गरजू लोकांना मदतीचा हात दिला.सध्या ऑक्सिजनचे महत्त्व
प्रत्येकाला चांगलेच समजले आहे.तेव्हा अशावेळी वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी योगेश माने यांनी मिञ परिवाराला सोबत घेऊन वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा केला.याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र मोरे,अविनाश लोंढे.विश्वजीत शिंदे,योगेश माने,प्रितम वाघमारे,गोविंद गालफाडे,प्रणव चौधरी,हर्षद गायकवाड,अमर मांदळे,अमोल मोरे यांच्यासह फ्रेंड्स क्लब सहभागी झाला होता.