सोयगाव शहराला वादळाचा तडाखा ,जरंडीला अवकाळी पावसाचा जोर अधिक

Last Updated by संपादक

सोयगाव,ता.१६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―

सोयगावसह परिसरात रविवारी अचानक ढगाळ वातावरणाने घट्ट विळखा घालून वादळी वाऱ्याच्या तडाखा दिल्याने अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.ऐन खरिपाच्या पेरण्यांच्या पूर्वतयारीच्या कालावधीत पावसाने हजेरी लावल्याने मशागतीच्या कामांना सोयगाव परिसरात गती मिळणार आहे.

सोयगाव सह तेरा गावांना अवकाळी पावसाचा कमी अधिक जोराचा फटका बसला आहे.यामध्ये जरंडी,निंबायती,या भागात पावसाचा जोर अधिक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले रविवारी शेतात खरिपाच्या पूर्वतयारीला शेतात असतांना अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेताकायांची सायंकाळी धांदल उडाली होती.मात्र अवकाळी पावसासोबत वादळी वारयांचाही फटका बसल्याने सोयगाव परिसरात धावपळ उडाली होती.अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयगाव परिसरात वातावरणात बदल झाला असल्याने शेतकऱ्यांची मात्र खरिपाच्या पेरण्यांची धांदल सुरु होणार आहे.परंतु शासनाने खरिपाच्या बियाण्यांच्या विक्रीवर निर्बंध घातल्याने शेतकऱ्यांना जून मध्येच बियाणे उपलब्ध होण्याची आशा आहे.

जरंडी,निंबायतीला चक्रीवादळ वादळाचा तडाखा—–

जरंडी परिसरात अवकाळी पावसाच्या उघडिपी नंतर तब्बल तीस मिनिटे वादळाने तडाखा दिल्याने घरांवरील पत्रांचा मोठा आवाज झाला होता.मात्र या घटनेत कोणतीही हानी झालेली नसून सोयगाव शहरालाही वादळाचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे अचानक पावसाच्या उघडिपी नंतर आलेल्या वादळाचा प्रकार कोणता असेल याबाबत नागरिक साशंक होते.

तालुका प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना—-

सोयगाव तालुक्यात ता.१६ आणि ता.१७ दोन दिवस वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने तालुका प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये व घरातच बसावे असे तालुका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वीज महावितरणची दमछाक—-

वादळी वार्याच्या सतर्कतेच्या आदेशाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मात्र वीज पुरवठ्याबाबत सतर्क राहावे लागल्याने ता.१६ पासून गावागावात वीज लाईनमनला सातारक राहून वीज वितरणच्या पुरवठ्याबाबत वादळाचा तडाखा पाहून निर्णय घ्यावा लागत आहे.