निमखेडी-वडगाव(कडे)शिवारात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर लाकुडतोड्याचा हल्ला ,हल्लातून बचावले कर्मचारी

सोयगाव,दि.१६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―

निमखेडी-वडगाव(कडे) शिवारात अवैध लाकुडतोड्याकडून छापा टाकण्यासाठी आलेल्या सोयगाव वन पथकावर हल्ला चढविल्याची घटना खळबळजनक रविवारी सायंकाळी निमखेडी शिवारात घडली.या घटनेत वन कर्मचाऱ्यांनी शिताफीने हल्ला परतवून अखेरीस लाकूडतोड्याविरुद्ध वान्गुन्हा दाखल करून लाखोंचा वनऐवज जप्त केला आहे.या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सोयगाव वनविभागाच्या पथकाकडून रविवारी(दि.१६)मौजे निमखेडी वडगाव(कडे) शिवारात मालकीच्या शेतामध्ये अवैध लाकूडतोड्यामार्फत लाकूड तोड सुरू असून त्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव प्रादेशिक श्री. राहुल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण तीन छापामार पथक घटनास्थळी दाखल होताच अवैध लाकूडतोड्यांनी या वन पथकांवर धारदार शस्रांनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

वनपरिमंडळ अधिकारी(बनोटी)अनिल पाटील यांनी वेळीच सतर्कता दाखवीत हल्ला परतवून लावून वन कर्मचाऱ्यांना बालंबाल वाचवून अखेरीस शिताफीने छापा टाकून वन ऐवज जप्त केला आहे.या घटनेत निमखेडी शिवारात जयमोक्यावर दुपारी 3.00 छापा मारण्यात आला. त्यावेळी वनतस्करांनी धारदार कुऱ्हाडीने वनकर्मचावर हल्ला केला. वनकर्मचार्यांनी वेळीच प्रसंगावधान राखून त्यांचा हल्ला परतवून लावल्याने मोठा अनर्थ टळला..या कारवाई मध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीसह,लाकूड कटर मशीन,कुर्हाड संख्या 8,बेहडा व भोकर चा मोठा लाकूडसाठा असा ऐवज जप्त करून संबंधिता विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी पाचोरा येथील अवैध लाकूड तस्करांवर वनकायदयानुसार वनगुन्हा नोंद केला.आणि मुद्देमाल जप्त केला.सदर कारवाईमध्ये वनरक्षक योगेश बोखारे,महादू शिंदे,नितेश मूलताने,नागरगोजे,कृष्णा पाटील,वानखेडे,दशरथ चौधरी,झामू पवार,अमृत राठोड,रवी मोरे आदींच्या

पथकाने हि कारवाई कारवाई करून वनतस्करांची धुळदान उडवून दिली.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करणे आवश्यक असल्याने अवैध वृक्षतोडीला पायबंद घालण्यासाठी वनकर्मचारी कोरोनाकाळात सुद्धा रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून गस्त करीत असतात.―राहुल सपकाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव


संबंधिता विरोधात वनगुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे. अवैध वृक्षतोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. वनतस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी सोयगाव वनविभागावातील वनसैनिक सदैव तत्पर आहेत.

–अनिल पाटील

वनपरिमंडळ अधिकारी बनोटी