अँटीजेन टेस्ट बंद व ऑक्सिजन वॉर्ड नसल्यामुळे पाटोदा तालुक्यातील रुग्णसंख्या चौपटीने वाढली

पाटोदा:नानासाहेब डिडुळ―
पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालय व सभोवताली परिसरामध्ये अँटीजन टेस्ट शासनाकडून दोन आठवड्यापासून कुछ नही यामुळे 50 च्या आसपास असलेले रुग्ण संख्या आज 250 आसपास जाऊन पोहोचली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे यातच मंजूर झालेले ऑक्सिजन सेंटर हे एक महिन्यापासून प्रशासकीय दिरंगाईमुळे सुरू झाली नाही. यामुळे काही दिवसांमध्ये पाटोदा येथील रुग्णसंख्या ही एक हजार पेक्षाही दिवसाला जास्त होऊ शकते.
तालुका प्रशासन हे चालढकल करत असून फक्त उडवाउडवीची उत्तरे देत आहे. गेल्या एक महिन्यापासून पाठपुरावा करूनही काही डॉक्टरचे वैयक्तिक दवाखान्यात असल्यामुळे पाटोदा मध्ये ऑक्सिजन सेंटर सुरू झाले नाही. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाला कसलीही जाग येत नाही प्रशासन निर्ढावलेले आहे. गेंड्या पेक्षाही जाड कातडी पांघरून झोपेचे सोंग घेतले आहे. याचा प्रत्यय काही दिवसांमध्ये पाटोदा मध्ये रोज एक हजार पेशंट कोरोना चे रोज पॉझिटिव्ह निघतील व प्रशासकीय यंत्रणा अपुरी असल्यामुळे मृत्यूचे तांडव तालुक्यात दिसतील.