औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― राज्यपाल नियुक्त बारा आमदार गेल्या अनेक दिवसापासून नियुक्त झालेले नाहीत.दरम्यान च्या काळात अनेकजण आमदारकीचे स्वप्न पाहत आहेत.ज्यांचं काही कर्तृत्व नाही असे लोक पण दिवसा स्वप्न पाहत आहेत.पण खऱ्या हाडाच्या कार्यकर्त्यावर मात्र अन्याय होताना दिसत आहे.
महाराष्ट्र मध्ये जवळपास दीड कोटी वंजारी समाज आहे .लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणारा व लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या आदेशाला मानून चालणारा हा समस्त वंजारी समाज आहे .याच वंजारी समाजातील सर्वात बलाढ्य संघटना असणाऱ्या अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष ,भाजपा विदर्भ प्रभारी म्हणून प्रभावी काम करणारे युवक नेते लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र श्री धनराज विक्रम गुट्टे याना राज्यपालांनी विशेष अधिकारात विधानपरिषदेवर नियुक्त करून सामान्य कार्यकर्त्याला आमदार करावं अशी मागणी आता जोर धरत आहे.
श्री धनराज गुट्टे हे भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या मर्जीतील म्ह्णून परिचित आहेत.तसेच ते उच्चशिक्षित आहेत ,उत्कृष्ट संघटक व उत्कृष्ट वक्ते आहेत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये त्यांचे खुप मोठे कार्यकर्त्याचे जाळे आहे .प्रशासनावर मजबूत पकड आहे.सर्व विषयांचा अभ्यास आहे .शिवाय ते अवघ्या 31 वर्षांचे आहेत.राज्यभरात लाखो तरुण वर्ग व सुशिक्षित वर्ग शेतकरी गोर गरीब वर्ग त्यांच्या सोबत आहे.रेल्वे बोर्डाचे सदस्य म्ह्णून सुद्धा ते प्रभावी पणे काम करत आहेत.पक्षा सोबत ते एकनिष्ठ आहेत.राज्यतील अनेक आमदार खासदार मंत्री यांच्या सोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत.पक्षा साठी प्रत्येक निवडणुकी साठी महाराष्ट्र सह विविध राज्यात स्वखर्चाने सहभागी असतात पक्ष वाढी साठी त्यांनी स्वतःला झोकून दिलेले आहे .वंजारी समाजातील महाराष्ट्र मधील प्रत्येक गावात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.शिवाय बारा महिने ते संघटना व पक्ष कार्यासाठी अविरत प्रवास करत आहेत.लोकांच्या सुख दुःखात ते सहभागी असतात.अनेक आंदोलनात त्यांना जेल मध्ये सुद्धा जावे लागले आहे. अनेक राजकीय आंदोलनात आजही अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.वंजारी समाजाची एकमेव बलाढ्य संघटनेचे ते अध्यक्ष आहेत शिवाय मुंडे परिवाराचे एकनिष्ठ व कट्टर म्हणून ते सुपरिचित आहेत.त्यामुळे वरील सर्व गोष्टींचा विचार करून राज्यपाल महोदयांनी त्यांना विधान परिषदेत संधी देऊन आमदार करावं व गोर गरिबांच्या कैवाऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी राज्यतील युवा वर्गाकडून जोर धरत आहे.
काँग्रेस सह काही पक्ष वंजारी समाजात फोड करण्यासाठी समाजातील समाज मान्यता नसलेल्या लोकांना आमदार कीचे गाजर दाखवून समाजाच विघटन करण्याचा प्रयत्न करत आहेत.धनराज गुट्टे सारख्या तरुण उमद्या कार्यकर्त्याला राज्यपालांनी संधी द्यावी ही मागणी आता राज्यात जोर धरत आहे.
विधान परिषदेत कोण असावं ?
हुशार अभ्यासू,चाणाक्ष,खुप शिक्षण घेतलेला, प्रत्येक विषयाचा अभ्यास असणारा,जाणकार, राज्याचा अभ्यास असणारा,वैयक्तिक गुन्हे दाखल नसलेला,समाज मान्यता असणारा,भाषण शैली इत्यादी गुण असणारा हाडाचा कार्यकर्ता असावा अशी व्याख्या आहे थोडक्यात.