आजोबांनी रंगविलेली स्वप्ने पाहण्यास आता ते नाहीत…घोसला येथील तरुणीची पहिली खंत

घोसला,ता.०१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― माझ्या आजोबांनी रंगविलेली स्वप्ने प्रत्यक्षात उतरले आहे परंतु आता ते या जगात नाही अशी खंत घोसला ता.सोयगाव येथील तरुणी वैष्णवी भगवान पाटील यांनी व्यक्त केली आहे,वैष्णवीला कोरोनाशी संघर्ष करण्यासाठी नोकरी पासून ते कुटुंबियांपर्यंत प्रवास करावा लागला होता.त्याच वैष्णवीला मंगळवारी थेट टाटा कामुनिकेषण मध्ये तुमची निवड झाल्याचा कॉल आला परंतु तिला पहिली आठवण आली ती म्हणजे मुकात्याच कोरोना संसार्गात मृत पावलेल्या आजोबाची…..माझे आजोबा त्यांची स्वप्ने पहावयास नसल्याची पहिली प्रतिक्रिया तिने कॉल येताच दिली आहे. घोसला येथील वैष्णवीने मात्र कोरोना मध्ये हि जिद्द सोडली नसल्याने आजोबांचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिने संघर्ष सुरूच ठेवला व मंगळवारी तिचा संघर्ष संपला आहे.औरंगाबाद येथील रवींद्र प्राथमिक विद्यालय औरंगाबाद येथे 10 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या वैष्णवीने मनाशी मोठे स्वप्न बाळगले होते.10 वी नन्तर मी इलेक्ट्रॉनिक मधून डिप्लोमा केला व 3 वर्ष झाल्यावर बी टेक ला प्रवेश घेवून घोसला सारख्या छोट्याशा गावातून तिने केले 3 वर्ष बी टेक पूर्ण केले व मंगळवारी तिला इंटर्न शिप साठी पुण्याला टाटा कम्युनिकेशन लिमिटेड कम्पनीत सलेक्शन झाले परंतु मागच्या वर्षी कोरोना मुळे घरी वापस यावे लागले म्हणून मागचे वर्ष असेच वाया गेले परंतु या वर्षी माझे त्याच कम्पनीत इंजिनिअर म्हणून सलेक्शन झाले पण आजच्या आमच्या या आनंदात सहभागी व्हायला माझे आई व दादा नाहीय म्हणून खूप वाईट वाटत आहे कोरोना ने खूप वाईट वेळ आणल्याचे तिने सांगितले माझे दादा मला मागच्या वर्ष्या पासून फोन करायचे की झाल का बाई तुझे कुठे नोकरीचे म्हणून परंतु तिथे पण कोरोनाच नडला आणि माझ्या आजी आजोबांना पण कोरोनाच घेऊन गेला अशी पहिली खंत वैष्णवीने व्यक्त केली आहे.