बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचा विधायक उपक्रम
==================
अंबाजोगाई (वार्ताहर):
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करून बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे वतीने अंबाजोगाई नगरपरीषदेच्या स्वच्छता विभागातील ५० महिला व १०० पुरूष सफाई कामगारांना शुक्रवार,दिनांक २१ मे रोजी मास्क वाटप करण्याचा विधायक उपक्रम राबविण्यात आला.
प्रारंभी नगरपरीषदेचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय इमारती खालील जुन्या बडोदा बँकेचा हॉल येथे आयोजित अभिवादन प्रसंगी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे हस्ते स्व.राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की,दिवंगत राजीवजी गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात तंत्रज्ञान विकासात पुढाकार घेतला.भारतात संगणक क्रांती आणण्याचे आणि पंचायतीराज व्यवस्थेचा पाया भक्कमपणे रचण्याचे श्रेय त्यांनाच जाते.या सोबतच राष्ट्रीय शिक्षण विषयक धोरणाची घोषणा केल्यानंतर संपूर्ण देशात उच्च शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण व विस्तार करण्यावर त्यांनी भर दिला.नव्या भारताच्या निर्मितीचे जे स्वप्न देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांनी पाहीले होते ते स्वप्न आज सत्यात उतरले आहे.ते आधुनिक भारताचे शिल्पकार व दूरसंचार क्रांतीचे प्रणेते आहेत,देशाच्या विकासाला नवी दिशा देणारे,माजी पंतप्रधान म्हणून ही भारतरत्न राजीवजी गांधी यांचेकडे पाहीले जाते.आज एकविसाव्या शतकात भारताचा जो डंका वाजत आहे,माहिती तंत्रज्ञानात आज जगात निर्माण झालेला आपला दबदबा,या सर्वांचा भक्कम पाया राजीवजींनीच रचला होता.१८ वर्षांवरील तरूणांना मतदानाचा हक्क,ग्रामसमृद्धीसाठी पंचायतराज व्यवस्था,महिलांचे सबलीकरण,दूरसंचार क्रांती आणून राजीवजींनी भारताला जगात बळकट केले.राजीवजींचे योगदान,त्याग व हौतात्म्य भारत देश कधीही विसरू शकणार नाही.वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधान बनलेले राजीवजी गांधी हे भारताचे सर्वांत तरूण पंतप्रधान होते आणि कदाचित जगातील अशा तरूण राजकीय नेत्यांपैकी एक होते.ज्यांनी भारत सरकारचे नेतृत्व केले.ख-या अर्थाने तेच भारतातील डिजिटल क्रांतीचे जनक आहेत.देशाच्या विकासाला नवी दिशा देणारे,नव्या भारताच्या निर्मितीचे स्वप्न पाहणारे देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांचा आज २१ मे हा स्मृतिदिन त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.त्यांनी देशवासियांना दिलेले बंधुभाव आणि एकात्मतेचे विचार नेहमीच प्रेरणादायी राहतील असे प्रतिपादन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने यांनी केले तर उपस्थितांचे आभार आनंद टाकळकर यांनी मानले.या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक सुनिल व्यवहारे,राणा चव्हाण,भारत जोगदंड,अमोल मिसाळ,प्रताप देवकर,सचिन जाधव तसेच अंबाजोगाई नगरपरीषदेच्या स्वच्छता विभागातील प्रमुख श्रीकांत थोरात,भरत लखेरा,खाजगी कंञाटदार प्रतिनिधी संजय कदम आदींची उपस्थिती होती.
*१५० सफाई कामगारांना मास्क वाटप*
==================
बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून भारताचे दिवंगत स्व.पंतप्रधान राजीवजी गांधी यांचे स्मृतिदिनानिमित्त अंबाजोगाई नगरपरीषदेच्या स्वच्छता विभागातील सफाई कामगार ज्यांनी कोरोना संकटकाळात ही दररोज अंबाजोगाई शहर व परिसरातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.अशा १५० महीला व पुरूष कायमस्वरूपी आणि कंञाटी कामगारांना एन-९५ मास्कचे वाटप करण्यात आले.मागील काही महिन्यांपूर्वीच गरजू कुटूंबिय यांना किराणा साहित्य,अन्नधान्य वाटप करण्यात आले. मास्क,सॅनिटायझर वाटप केले.बीड जिल्ह्यातील परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्यात आली.गरजू रूग्णांना वैद्यकीय मदत व सहाय्यता केली.राज्यात रक्ताचा तुडवडा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राचे सन्माननिय मुख्यमंञी,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आरोग्यमंञी यांच्या आवाहनानुसार एक हजारच्या जवळपास काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी वेळोवेळी रक्तदान केले.पुढील काळातही आम्ही जनसेवेसाठी कटिबद्ध आहोत.
– राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमेटी.)