संजय गांधी निराधार योजनेसह शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थींचे अनुदान घरपोहोंच देण्यात यावे- राजकिशोर मोदी

Last Updated by संपादक

अंबाजोगाई (वार्ताहर):
संजय गांधी निराधार योजनेसह शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थींचे अनुदान घरपोहोंच देण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतरही ४ विषयांच्या अनुषंगाने बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी जिल्हाधिकारी बीड यांना मंगळवार,दिनांक २५ मे रोजी निवेदन दिले आहे.

जिल्हाधिकारी बीड यांना उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांचे मार्फत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,मागील एक वर्षापासून आपण कोरोना या महामारीशी लढा देत आहोत यासाठी बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत त्याबद्दल सर्व प्रशासनाचे हार्दिक अभिनंदन व स्वागत करीत आहोत. परंतु,प्रशासनाने आम्ही केलेल्या सुचनांचा संवेदनशीलपणे विचार करावा.सदर सुचना अशा संजय गांधी निराधार योजना,वृद्धापकाळ पेंशन योजना यासह शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनेतील विद्यमान लाभार्थींचे अनुदान लातूर जिल्ह्याच्या धर्तीवर बीड जिल्ह्यात घर पोहोंच देण्यात यावे.यामुळे निराधार,वृद्ध व गरजू लाभार्थ्यांना लॉकडाऊन मध्ये फायदा होईल तसेच अंबाजोगाई शहरात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम गतीमान करण्यात यावी,लसीकरण नोंदणी प्रक्रिया सोपी करून लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी,मागील दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधी पासून किराणा मालाचे दुकाने बंद आहेत यामुळे दैनंदिन जीवनाश्यक वस्तू मिळणे कठिण बनले आहे.अशा वेळी अत्यावश्यक सेवेतील किराणा विक्रीची दुकाने नियोजित वेळेत सुरू करावीत,बँकेचा कालावधी कमी असल्याने तसेच लवकरच पेरणीसाठी शेतकरी बांधवांना आणि दैनंदिन गरजेचे वस्तू खरेदी करण्यासाठी सर्व सामान्य जनतेला बँकिंग व्यवहार करणे गरजेचे आहे.तेव्हा बँकांचा सुरू असण्याचा कालावधी वाढवावा.तसेच पावसाळा सुरू होणार असल्याने अनेकांची सुरू असलेली बांधकामे बंद अवस्थेत आहेत.कारण,बांधकामासाठी लागणारे साहित्य विक्रीची दुकाने बंद आहेत.तेव्हा ही दुकाने नियोजित वेळेत सुरू करावीत.अशी विनंती या निवेदनाद्वारे करीत आहोत असे निवेदक राजकिशोर मोदी यांनी नमुद केले आहे.सदरील निवेदनावर अंबाजोगाई शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक अमोल लोमटे,सुनिल व्यवहारे,धम्मपाल सरवदे,माणिक वडवणकर,सुनिल वाघाळकर,राणा चव्हाण,भारत जोगदंड,जावेद गवळी,महेबूब गवळी, सुशिल जोशी,प्रताप देवकर,अजीम जरगर, बालाजी जोगदंड, अमोल मिसाळ आदींच्या स्वाक्ष-या आहेत.