भाजपाच्या मोदी सरकार विरोधात बीड जिल्ह्यात काँग्रेसची निदर्शने ,मोदी सरकारचा सात वर्षांचा काळा कारभार भारताला भुकेकंगाल करणारा-राजकिशोर मोदी

अंबाजोगाई (वार्ताहर):
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षांतील कारभाराने भारत देश हा २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम आज देशातील जनतेला भोगावे लागत आहेत.भाजपाच्या मोदी सरकारचा सात वर्षांचा काळा कारभार हा भारताला भुकेकंगाल करणारा असल्याचे सांगून राजकिशोर मोदी यांनी
काँग्रेस आज रविवार,दिनांक ३० मे रोजी राज्यासह बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करीत मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल केली अशी माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती देताना बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की,बीड जिल्हा मुख्यालय,तसेच अंबाजोगाई,गेवराई,माजलगाव,वडवणी,धारूर,परळी,आष्टी-पाटोदा-शिरूर या तालुक्याच्या ठिकाणी देखिल भाजपाच्या मोदी सरकार विरोधात काळे झेंडे घेवून निषेध करण्यात आला.मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे.विविध काळे कायदे आणले गेले,याचे निदर्शक म्हणून काळे झेंडे दाखवले.निदर्शनाच्या ठिकाणी प्रतिकात्मक सात पुतळे ठेवले होते,तसेच राज्यातील प्रत्येक विभागात आज रोजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते,मंत्री हे मोदी सरकारच्या अपयशी कारभाराची पोलखोल करीत आहेत.मागील सात वर्षांत भाजपाने भारत देशाला भुकेकंगाल करून महागाई,बेरोजगारी व असुरक्षिततेच्या दरीत लोटले,देशातील नागरिकांवर अन्याय अत्याचार केले आहेत.या कठीण काळात काँग्रेस पक्ष भारतातील गोरगरीब,वंचित,अल्पसंख्यांक,अदिवासी,शेतकरी,शेतमजूर,श्रमिक,कामगार व बेरोजगार तरूणाई सोबत आहे अशी भूमिका स्पष्ट केली.तसेच खा.कुमारजी केतकर यांनी मोदी सरकारच्या सात वर्षांचे अपयश आपल्या “ऑनलाईन व्याख्यानातून” उघड केले आहे.कोरोना संदर्भात शासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचना व नियमांचे पालन करून प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून व नेतृत्वाखाली अंबाजोगाईत सावरकर चौक परिसरात आंदोलन करण्यात आले अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.यावेळी आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी,ॲड.विष्णुपंत सोळंके,जिल्हा
उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक अमोल लोमटे,सुनिल व्यवहारे,धम्मपाल सरवदे,राणा चव्हाण,सुनिल वाघाळकर,खंडेराव टेमकर,कचरूलाल सारडा,अशोक देवकर,अकबर पठाण,अनिसोद्दीन मोमीन,माणिक वडवणकर,शेख मुख्तार,भारत जोगदंड,जावेद गवळी,सचिन जाधव,प्रताप देवकर,अजीम जरगर,अमोल मिसाळ यांच्यासह काँग्रेसच्या सर्व विभागचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी,नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

*मोदी सरकारचा सात वर्षांचा काळा कारभार भारताला भुकेकंगाल करणारा*
=============
मागील सात वर्षांत नरेंद्र मोदींनी विकासाच्या नावाखाली संपूर्ण भारत देश भकास करून टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षांत देशाला समृद्ध,स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले होते.त्याची पुरती वाताहात लावून भाजपाने भारत देश रसातळाला नेला आहे.मोदींच्या सात वर्षांतील या काळ्या कारभाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून आज रविवार,दिनांक ३० मे रोजी राज्यासह बीड जिल्ह्यात आंदोलन करीत आहोत.या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष हा भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल करीत आहे असे सांगून यासंदर्भात अधिक माहिती देताना मोदी म्हणाले की,वर्षाला दोन कोटी रोजगार,प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार,१०० दिवसांत महागाई कमी करणार,‘ना खाऊंगा,ना खाणे दूँगा’ म्हणत देशाची ‘चौकीदारी’ करण्याची भलीमोठी आश्वासने देत नरेंद्र मोदी सत्तेवर आले.पण,सात वर्षानंतरही मोदींनी दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन ते अद्यापही पूर्ण करू शकलेले नाहीत.सात वर्षांत महागाई एवढी वाढली की,आज लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे,नोटाबंदीने देशातील सर्व छोटे,मध्यम,लघु उद्योग बंद पडले आहेत,बेरोजगारी प्रचंड वाढली.काळे कृषि कायदे आणून शेतकरी,शेतमजूर व कामगार यांना देशोधडीला लावले आहेत.नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या नियंत्रणाखालील बँका,रेल्वे,सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आपल्या गुजराती व उद्योगपती मित्रांना अक्षरश: विकल्या आहेत,समाजा-समाजात भांडणे लावण्याचे उद्योग यापूर्वीही केले व सध्याही करीत आहेत.नरेंद्र
मोदींच्या राज्यात भारतीय समाजातील एकही घटक आज समाधानी वा आनंदी नाही.नरेंद्र मोदींच्या या जुलमी,अहंकारी
,हुकुमशाही कारभाराचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करीत आहे.निषेध करण्यासाठी आज रोजी काँग्रेस पक्ष राज्यासह बीड जिल्ह्यात आंदोलन करीत आहे.

*-राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमेटी.)*

*निदर्शनाच्या ठिकाणी प्रतिकात्मक सात पुतळ्यांनी लक्ष वेधले :-*

केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी काळे झेंडे दाखवत निदर्शन आंदोलने आयोजित करण्यात आले.निदर्शनाच्या ठिकाणी प्रतिकात्मक सात पुतळे ठेवून त्यातील प्रत्येक पुतळ्यावर काळ्या रंगाचा मुखवटा लावण्यात आला आणि त्यातील प्रत्येक पुतळ्यावर सरकारच्या अपयशाच्या मुद्यांचे फलक अडविण्यात आले.या आंदोलनामध्ये पुढीलप्रमाणे मुद्यांचा समावेश होता.१)कोविड साथ रोगाच्या नियंत्रणात गाफीलपणा,कोरोनाच्या दुस-या लाटेला रोखण्यात अपयश,लसीकरणात आलेले अपयश,२)पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव आणि महागाई,३) देशाची ढासळती अर्थव्यवस्था,नोटबंदी आणि जीएसटीमुळे झालेली देशाची दुर्दशा,४) संपूर्ण देशातील वाढती बेरोजगारी.५) शेतकरी विरोधी काळे कायदे, ६) आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की,७) मोदींच्या दोन उद्योगपती मित्रांसाठी देश विकायला काढला रेल्वे,विमानतळ, बंदरे,बीएसएनएल, पेट्रोलियम कंपन्या, बँका अशा सरकारी आस्थापना विकायला काढला ज्या जनतेची संपत्ती आहे.अशा प्रकारच्या मुद्यांचा समावेश होता.निदर्शनाच्या ठिकाणी प्रतिकात्मक सात पुतळ्यांनी व भाजप सरकार विरोधी दिलेल्या घोषणांनी लक्ष वेधले.