तरूणांनी इतिहासातून प्रेरणा घ्यावी-राजकिशोर मोदी ,पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून अभिवादन

अंबाजोगाई (प्रतिनिधी):
तरूण पिढीने पुस्तके व ग्रंथ वाचन करून सत्य काय,असत्य काय ते शोधले पाहिजे,ख-या इतिहासाचा शोध घ्यावा,पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर ह्या प्रजाहित दक्ष अशा राजमाता होत्या,त्यांच्या लोककार्याचा अभ्यास करून आजच्या तरूणांनी इतिहासातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन राजकिशोर मोदी यांनी केले.

बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून सहकार भवन हॉल येथे सोमवार,दिनांक ३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.अंबाजोगाई तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व प्रबोधनपर व्याख्यानाने साजरी करण्यात येते.मागील एक वर्षापासून कोविड संसर्गजन्य साथरोगामुळे आपले सण,उत्सव,महापुरूषांचे जयंती उत्सव आपणा सर्वांना अत्यंत साधेपणाने साजरे करावे लागत आहेत.अंबाजोगाईत बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी अंबाजोगाई शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष महादेव आदमाने,सुनिल व्यवहारे,धम्मपाल सरवदे,राणा चव्हाण,विशाल पोटभरे,अकबर पठाण,जावेद गवळी,भारत जोगदंड,शरद काळे,अमोल मिसाळ,अजीम जरगर आदींची उपस्थिती होती.