न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या वतीने ५ जुन रोजी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन “तंत्रज्ञान आणि कौशल्य” या विषयावर ५ दिवस मान्यवरांचे मार्गदर्शन

Last Updated by संपादक

अंबाजोगाई (वार्ताहर):
येथील न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या वतीने इयत्ता पाचवी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी “२१ व्या शतकातील तंत्रज्ञान आणि कौशल्याची नाविण्यपूर्ण कार्यशाळा” या विषयावर ऑनलाईन पध्दतीने दि.५ जुन २०२१ पासून दररोज पाच दिवस आयोजन करण्यात येत आहे.तरी या कार्यशाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून शिक्षण व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ,अनुभवी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व प्रवेश नोंदविण्याची अंतिम तारीख ही शुक्रवार,दिनांक ४ जुन २०२१ अशी आहे.यापूर्वी आपली नोंदणी करून प्रवेश निश्चित करावा.

येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू व्हिजन पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा सन २००४ पासून अंबाजोगाई शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना सी.बी.एस.ई.बोर्डाचे शिक्षण देणारी पहीली शाळा म्हणून ओळखली जाते.या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि देशपातळीवरील शिक्षण,तंत्रज्ञान आणि कौशल्य,खेळ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थ्यांना साततत्याने करून देण्याचे काम या संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी हे नेहमीच करीत आहेत.आज आपले विद्यार्थी हे २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत आहेत.आज विद्यार्थ्यांना मोबाईल व संगणकाला इंटरनेट जोडून पुर्ण जगाला स्वतःला जोडता येते.हीच बाब ओळखून न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या वतीने “२१ व्या शतकातील तंत्रज्ञान आणि कौशल्याची नाविण्यपूर्ण कार्यशाळा” ऑनलाईन पध्दतीने शनिवार,दि.५ जुन २०२१ पासून दररोज सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत या वेळेत आयोजित करण्यात येत आहे.हि कार्यशाळा ५ दिवसांची आहे.या कार्यशाळेत रोबोटिक्स,थ्री डी प्रींटर ॲण्ड डिझायनिंग,ब्लॉक कोडींग,अर्टिफिसीयल इंटेलिजन्स,ॲप डेव्हलपमेंट,इंटरनेट ऑफ थिंग्ज (आएओटी) इत्यादी कौशल्य शिकवण्यात येणार आहेत.तसेच ही या कार्यशाळेची काही वैशिष्ट्ये आहेत.न्यु व्हिजन पब्लिक स्कुलच्या सर्व विद्यार्थ्यांना कार्यशाळेत मोफत प्रवेश,मार्गदर्शन करून शिकवले जाणार आहे.सध्या
न्यु व्हिजन पब्लिक स्कुल मध्ये नर्सरी ते बारावी वर्गासाठी शालेय प्रवेश सुरू आहेत.प्रवेश घेणारांना ५ दिवसांचा हा अभ्यासक्रम मोफत शिकवण्यात येणार आहे.आजचा विद्यार्थी हा नवीन शिक्षण पध्दतीला सामोरे जाणार आहे.ज्यामध्ये कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रमात समावेश होणार आहे.याच मुलभूत बाबींचा विचार करून न्यू व्हिजन पब्लिक स्कुल मध्ये शिकत असलेल्या आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणा-या इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वी वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत मोफत प्रवेश दिला जाणार आहे.गेल्या एक वर्षापासून संस्थेचे विद्यार्थी हे ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेत आहेत.याचाच आधार घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने या कोर्सचे प्रशिक्षण दररोज १२० मिनिटे विविध तज्ञ मार्गदर्शकांकडून देण्यात येणार आहे.तरी अंबाजोगाई व परिसरातील पालकांनी आपल्या पाल्याचा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेश न्यू व्हिजन पब्लिक स्कूल (सी.बी.एस.ई.) मध्ये करून या कार्यशाळेचा फायदा आणि शिक्षण क्षेत्रातील नवा अनुभव मिळवावा असे आवाहन संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी,प्राचार्य डाॅ.बी.आय.खडकभावी,प्रा.वसंतराव चव्हाण,प्रा.डॉ डी.एच.थोरात,संस्थेचे अध्यक्ष भुषण मोदी,कार्यकारी संचालक संकेत मोदी यांनी केले आहे.या कार्यशाळेचा प्रवेश शुक्रवार,दिनांक ४ जुन २०२१ आहे याची नोंद घ्यावी.तरी पालकांनी अधिक माहितीसाठी तात्काळ :- (८६२२०३११११) या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.