मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू मांडण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील आज अंबाजोगाईत

Last Updated by संपादक

बैठकीतून साधणार मराठा समाज बांधवांसोबत संवाद-जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांची माहिती

==================
अंबाजोगाई (वार्ताहर):
मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मराठा आरक्षणाचे अभ्यासक,राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील आज बुधवार,दिनांक २ जून रोजी अंबाजोगाईत येत आहेत.लाखे पाटील हे आपल्या दौ-याची सुरूवात मराठवाड्यापासून करीत आहेत.ते या विषयांवर संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत.यानिमित्ताने ते अंबाजोगाईत आयोजित बैठकीतून मराठा समाज बांधव,काँग्रेसचे नेते,लोकप्रतिनिधी,मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मराठा समाजातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेवून बैठकीतून संवाद साधणार आहेत अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांचे आदेशानुसार काँग्रेस राज्य प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील हे मराठा आरक्षणाबाबत सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत.सर्वोच्च न्यायालयामधील मराठा आरक्षण प्रकरणामध्ये निकाल मराठा समाजाच्या विरोधात जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे असा धांदांत खोटा प्रचार व दिशाभूल राज्यभरात भाजपा नेते करीत असून,विषेशतः मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात बैठका,पत्रकार परिषद आणि मराठा समाजातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन रस्त्यावर येण्यासाठी उत्तेजीत करत आहेत.लवकरच राज्यभरात असे मेळावे भाजपाच्या व्यवस्थापन आणि आर्थिक तंत्राच्या मदतीने घेतले जाणार आहेत.मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू आणि पेच काँग्रेसचे नेते,लोकप्रतिनिधी, मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बैठका आयोजीत करून तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसमोर मांडण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी केंद्रातील मोदी सरकारने १०२ वी घटनादुरुस्ती अत्यंत घाईत मंजूर केली आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०२ व्या घटनादुरूस्ती नंतर राज्यांना SEBC प्रवर्ग जाहीर करण्याचे अधिकार नसताना १०२ व्या घटनादुरूस्ती नंतर तब्बल १०६ दिवसांनी मराठा समाजाला SEBC आरक्षणाचा कायद्याचा शासन आदेश काढून मराठा समाजाची घोर फसवणूक केली.ही वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी मराठा आरक्षणाचे अभ्यासक,राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील हे मराठवाड्यापासून राज्याचा दौरा करीत असून आज बुधवार,दि.२ जून २०२१ रोजी अंबाजोगाई येथे लोकनेते विलासरावजी देशमुख सभागृहात दुपारी ४.३० वाजता शासनाने निर्गमीत केलेल्या कोविड १९ या साथ रोगा संबधातील सर्व नियम पाळून बैठक होईल.तसेच शुक्रवार,दिनांक ४ जून २०२१ रोजी बीड येथे सकाळी ११ वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी मार्फत आयोजीत बैठकीतून ते मराठा समाज बांधव,काँग्रेसचे नेते,लोकप्रतिनिधी,मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मराठा समाजातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेवून बैठकीतून संवाद साधणार आहेत तरी या बैठकीस बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे सर्व पदाधिकारी,सर्व सेलचे अध्यक्ष आणि मराठा समाजातील सर्व संघटना व त्यांचे पदाधिकारी यांनी मराठा आरक्षण बाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.