राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ,जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे-संयोजक राजेश्वर चव्हाण यांचे आवाहन

अंबाजोगाई (वार्ताहर):
माजी आमदार अमरसिंह पंडीत यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन अशा दोन गटांत होणार आहे.तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक राजेश्वर आबा चव्हाण यांनी केले आहे.

स्पर्धेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.गट अ) शालेयस्तर मुले/मुली :- विषय :- १) महाराष्ट्राच्या जडणघडणी मध्ये देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवार साहेबांचे यांचे योगदान,२) माझा आवडता महापुरूष,३) ऑनलाईन शिक्षण व भावी पिढी,४) जनतेच्या प्रश्नांशी भिडणारा नेता अमरसिंह पंडित आणि गट ब) महाविद्यालयीन मुले/मुली :- विषय १) महाराष्ट्राच्या जडणघडणी मध्ये देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवार साहेबांचे यांचे योगदान,२) कोरोनाचे सामाजिक राजकीय शैक्षणिक परिणाम,३) कोरोना जनजागृती माझी भूमिका,४) जनतेच्या प्रश्नांशी भिडणारा नेता अमरसिंह पंडित असे आहेत.तर स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत :- १) प्रत्येक स्पर्धकाने दिलेल्या कोणत्याही एका विषयावर आपले मत व्यक्त करावे.,२) स्पर्धकाने कमीत कमी ७ मिनिटांचा व्हिडिओ तयार करावा आणि तो व्हिडिओ परिक्षक रवी देशमुख यांच्या (९४२००१५५१४) या व्हॉट्सॲप मोबाईल नंबरवर पाठवावा.,३) स्पर्धकाने आपला परिचय भाषणाच्या सुरूवातीस जास्तीत जास्त अर्ध्या मिनिटात द्यावा.,४) स्पर्धकाने आपले आधारकार्ड व शाळेत अथवा महाविद्यालयात शिकत असलेला पुरावा द्यावा.,५) स्पर्धकाने आपले मत मांडलेला व्हिडिओ मंगळवार,दिनांक ८ जून २०२१ पर्यंत दिलेल्या व्हॉट्सॲप मोबाईल नंबरवर पाठवावा.६) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यावी.,७) स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण मंगळवार,दिनांक १५ जून २०२१ रोजी होईल.बक्षीस वितरण ठिकाण सोमवार,दिनांक १४ जून २०२१ रोजी विजेत्या स्पर्धकांना कळविले जाईल.स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१/- रूपये व सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक ३००१/- रूपये व सन्मानचिन्ह आणि तृतीय पारितोषिक २००१/- रूपये व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात येईल.सदरील स्पर्धेचे परीक्षण परिक्षक विकास कुलकर्णी आणि रवीकिरण आबासाहेब देशमुख हे करतील.अशी माहिती देवून राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे संयोजक राजेश्वर आबा चव्हाण यांनी केले आहे.