कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानासाहेब पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत वृक्षारोपण ,आ.नानाभाऊ पटोले हे ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची जाण असणारे नेतृत्व-राजकिशोर मोदी

Last Updated by संपादक

अंबाजोगाई (वार्ताहर):
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानासाहेब पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून अंबाजोगाई शहरात ५ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष संगोपन व संवर्धन याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांचे वाढदिवसानिमित्त वृक्षारोप भेट देवून सन्मान करण्यात आले.यानिमित्ताने बोलताना आ.नानाभाऊ पटोले हे ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची जाण असणारे कणखर नेतृत्व असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले.

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीकडून शनिवार,दिनांक ५ जून रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून अंबाजोगाई शहर व परिसरात चौसाळकर कॉलनी,महाजन मळा (माळीनगर),मोदी लर्निग सेंटर रिंगरोड (शेपवाडी),आदर्शनगर आदी पाच ठिकाणी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यासोबतच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५० विविध वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.तसेच वाढदिवसानिमित्त स्वाराती शासकीय वैद्यकिय रूग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे,रविंद्र पाटील,शेख मुख्तार,अशोक काळे आणि अजीम जरगर या विविध क्षेत्रात कार्यरत पाच जणांचा वाढदिवसानिमित्त फेटा बांधून व वृक्षरोप भेट देवून सन्मान करण्यात आला.या माध्यमातून प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी एक तरी वृक्षारोप लावावे असा मौलिक संदेश दिला.यावेळी अंबाजोगाई शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष महादेव आदमाने,सुनिल व्यवहारे,सुनिल वाघाळकर,राणा चव्हाण,कचरूलाल सारडा,भारत जोगदंड,सचिन जाधव,अजीम जरगर आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.वृक्षारोपणासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

*पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण होणे गरजेचे :-*
==================
दरवर्षीच ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो.पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे,समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे,हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.पर्यावरणाचे आपल्याभोवती असणे आपण गृहीत धरून,गेली काही दशके,त्यातील विविध घटकांची हानी करत आलो आहोत.परंतु,पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागल्याने याबाबत जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.१९७२ साली युनोच्या सर्वसाधारण सभेने,मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत,पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले.संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय,औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले.त्यानुसार शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे.पर्यावरण संरक्षणाचे स्थान आणि त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन १०० पेक्षाही जास्त सहभागी देशांमध्ये आज विविध प्रकल्प राबविले जात आहेत.कारण,निसर्गातील सजीवांच्या अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या स्थितीला पोहोचल्या आहेत.अनेक सजीव आज पृथ्वीवरून कायमचे नष्ट झाले आहेत व होत आहेत.दररोज प्रदूषण वाढत आहे.हवामान बदलत आहे.आणि या सर्व स्थितीला आधुनिक मानवाची बेफिकीर जीवनशैलीच कारणीभूत आहे.वाढती जगाची लोकसंख्या,चंगळवाद भागविण्यासाठी मानवाने निसर्गाला ओरबाडणे असेच चालू ठेवले तर त्यावेळी पृथ्वीवर जगणेच मुश्किल होईल असा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.त्यामुळे प्रत्येक माणसाने वृक्षारोपण करून संगोपन व संवर्धन यासाठी पुढाकार घ्यावा.यावर्षी मी स्वता: २०० वृक्ष रोपांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे.आज ५० वृक्षारोपांची लागवड केली आहे.अंबाजोगाईतील नागरिकांनी देखिल यावर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणाकरीता पुढाकार घ्यावा.

*-राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमेटी.)*