आपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार

आ.नानासाहेब पटोले हे महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे नेतृत्व-जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख

गायक सुभाष शेप यांच्या गायनाने उत्साह संचारला ; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अंबाजोगाई (वार्ताहर):
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानासाहेब पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी शनिवार,दिनांक ५ जून रोजी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बळकटी देणारे डॉक्टर्स बांधव यांचा किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव,युवक नेते राहुल सोनवणे यांच्या हस्ते सन्मान केला.तसेच गायक सुभाष शेप यांच्या गायनाने उत्साह संचारला,वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.मागील काही दिवसांपासून आपेगाव येथे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव खूपच मोलाचा ठरला आहे.त्यांच्यामुळे अनेक रूग्ण कोरोनामुक्त होऊ शकले,त्यांचे ऋण कदापि विसरता येणारे नाही असे सांगून आ.नानासाहेब पटोले हे नेतृत्व बहुआयामी नेतृत्व हे महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे आहे अशा शब्दांत देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

डॉक्टरांचे रूग्णसेवेसाठी अविरत परिश्रम तसेच पुढाकार घेणा-या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीवरही देशमुख यांनी कौतुकाची थाप देत ऋण व्यक्त केले आहेत.कोरोना रूग्णांसाठी सुरू केलेले आपेगाव येथील कोविड केअर सेंटर सर्वांच्या सहकार्यातून यशस्वी होत आहेत.डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव खूप मोलाचा होता.प्रत्येकाने एकजूटीने आणि नियोजनबद्ध रितीने काम केल्याने हे शक्य होत आहे,त्यामुळे या सर्वांचेच आभार मी व्यक्त करतो.असेच काम भविष्यातही होईल असा विश्वास व्यक्त करून पुढे बोलताना आपल्या सेवेतून आम्ही अनेक रूग्णांना ठणठणीत बरे करू शकलो याचा आनंद आहे.डॉक्टर्स,आरोग्य व स्वच्छता कर्मचारी व काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांनी मागील महिनाभर जे अतोनात कष्ट घेतले त्याबद्दल खरेच कौतूक वाटते असे जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख म्हणाले.अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडीया)संस्था,अंबाजोगाई यांच्या श्री जयकिसान महाविद्यालय,आपेगाव या ठिकाणी जि.प. सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.नानासाहेब पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड योध्दे डॉक्टर बांधवांचा सत्कार समारंभ,राडी जिल्हा परिषद सर्कल मध्ये वृक्षारोपण आणि गायक सुभाष शेप व गायिका मयुरी यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.देशमुख यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ५० खाटांच्या कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना बाधित रूग्णांवर मोफत औषधोपचार करून रूग्णांना व्याधिमुक्त करण्यात येत आहे.कोविड योध्दे याकामी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.त्याबद्दल जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख माकेगावकर यांनी शनिवार,दिनांक ५ जून रोजी आपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार केला.यावेळी किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव,युवक नेते राहुल सोनवणे,पशुपतीनाथ दांगट,अंबाड,प्रतापराव मोरे,राजाभाऊ देशमुख,बळीराजे वाघमारे,आश्रुबा करडे यांचेसह डॉ.भारत नागरे,डॉ.अजय ठोंबरे,डॉ.धनेश्वर मेनकुदळे,डॉ.व्यंकट बेंबडे,डॉ.फड,डॉ.गायञी ढमाले,परीचारीका कावरे,ढाकणे,कराड,देशमुख,मुंडे,जगदाळे,शिंदे तसेच कर्मचारी अशोक राऊत,बालाजी वाघमारे,रवी सरवदे,अजित बनसोडे यांचीही उपस्थिती होती.सत्काराला उत्तर देताना डॉक्टर म्हणून धीर देत रूग्णांवर केलेले उपचार व प्रबोधनामुळे रूग्ण उपचारास प्रतिसाद देतो.रूग्णालयात रूग्णांना कसलीही
अडचण येवू नये याची काळजी घेण्यात येते.येथील डॉक्टर आपल्या कुटुंबातील व्यक्तीची काळजी घ्यावी त्याप्रमाणे रूग्णांची काळजी घेतात.आपेगाव कोविड केअर सेंटर मधून दर्जेदार आरोग्य सेवा,सुविधा देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत.हसत खेळत व आनंदी वातावरणात उपचार करण्यात आल्याने.हे कोविड सेंटर रूग्णांना “हॅप्पी होम” वाटते असे डॉ.अजय ठोंबरे हे म्हणाले.तर “वेळेवर योग्य ती खबरदारी घेतल्यानंतर कोरोना १०० टक्के बरा होतो.त्यामुळे
घाबरून न जाता योग्य औषधोपचार घ्यावेत.कोणतेही
दुखणे अंगावर काढू नका.आपल्या जवळच्या डॉक्टरांचा आरोग्य विषयक सल्ला घ्यावा.कोरोना झालेल्यांना धीर द्यावा.कोरोना बाधितांना आपुलकीने वागवा,आजारातून लवकर बरे होण्यासाठी रूग्णांना धीर द्यावा.” असे डॉ.भारत नागरे हे म्हणाले.

*यांचा झाला सन्मान :-*

कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दररोज येऊन रूग्णांची तपासणी व औषधोपचार करीत त्यांची काळजी घेणारे आपेगाव कोविड केअर सेंटर मधील रूग्णसेवेतील डॉक्टर्स डॉ.भारत नागरे,डॉ.अजय ठोंबरे,डॉ.धनेश्वर मेनकुदळे,डॉ.व्यंकट बेंबडे,डॉ.नरसिंग फड
यांचा राजेसाहेब देशमुख,किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव,राहुलभैय्या सोनवणे यांच्या हस्ते शाल,पुष्पहार व पुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला.रूग्णसेवेतून झालेली सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे आशिर्वाद राजेसाहेब देशमुख यांना मिळत आहेत असे यावेळी उपस्थित अनेकांनी सांगितले.तर यावेळेस बोलताना किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड.मानव जाधव म्हणाले की,डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी,पत्रकार,स्वच्छता तसेच पोलीस कर्मचारी,अधिकारी रूग्णवाहिका ड्रायव्हर,शेतकरी,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी ताई सेविका,सरपंच,ग्रामसेवक सामाजिक कार्यकर्ते,दुकानदार,घरोघरी वर्तमानपत्र पोहचविणारे वृत्तपत्र वितरक बांधव यासारख्या असंख्य लोकांचे आपल्यावर उपकार आहेत असे मला वाटते.त्यांनी स्वतःचा आणि कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून आपल्या सर्वांचे जीवन सुरळीत चालावे यासाठी अत्यावश्यक सेवा प्रदान केल्या,आजही करीत आहेत.एकट्या बीड जिल्ह्यात सुमारे १५ हजारांपेक्षा अधिक लोक हे तुम्हा-आम्हा सर्वांचे जीवन सुरक्षित राहावे यासाठी लढत आहेत.त्यांचा हा लढा ऐतिहासिक आहे.काहींनी यात प्राणही गमावले आहेत.त्यांनी जे बलिदान केले,त्याग केला,त्यातून आपण कधी ही उतराई होणार नाही.त्यांचे हे उपकार आपण कधीही फेडू शकत नसलो तरी त्यांच्याप्रती असलेला आपला कृतज्ञता भाव आपण त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्याचा चांगला व स्तुत्य उपक्रम आपेगाव येथे राजेसाहेब देशमुख यांनी आयोजित
करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे ॲड.माधव जाधव म्हणाले.तर यावेळेस बोलताना युवक नेते राहुल सोनवणे म्हणाले की,कोरोना योध्दा म्हणून आरोग्य क्षेत्रात डॉक्टर बांधव अतिशय उत्तम काम करीत आहेत.त्यांचा सन्मान करून राजेसाहेब देशमुख यांनी अभिनंदनीय कार्य केले आहे.यामुळे एक लहानशी कृती,जी त्यांना आनंद देऊन जाईल.आपण एक लहानसे फुल जरी त्यांना दिले तरी त्यांच्या चेहर्‍यावर आनंद देऊन जाईल अशी मला खात्री आहे,एखादे पुस्तक,शाल,श्रीफळ किंवा लहानसा पुष्पगुच्छ देऊन या देवमाणसांचा सत्कार कोणत्याही शक्य त्या स्वरूपात केला तरी त्यातून जी भावना निर्माण होईल ती सर्वाधिक महत्त्वाची आहे.येवू घातलेल्या कोरोनाच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे की,यावर्षी ही आपण स्वताःची व कुटूंबियांची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन राहूल सोनवणे यांनी केले.

*गायक सुभाष शेप यांच्या गायनाने उत्साह संचारला :*

येथील गायक सुभाष शेप व गायिका मयुरी यांनी आ.नानासाहेब पटोले यांच्या जन्मदिनानिमित्ताने आयोजित गीत गायन कार्यक्रमात देशभक्तीपर,भजन,
छञपती शिवरायांवर आधारित गीत,शेतकरी गीत,गारवा आणि निसर्गराजा आदी एकापेक्षा एक सरस,सुरेल व बहारदार गीते सादर करून कोरोना बाधित रूग्णांना आपल्यासोबत ठेका धरायला लावला.उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी मिळून गीत गायनात सहभागी घेतला.या अनोख्या उपक्रमाने तणावमुक्त वातावरणात दूर होऊन नवा उत्साह संचारल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

*सामाजिक बांधिलकीतून कोरोना योद्धांच्या सन्मान व वृक्षारोपण :-*

आ.नानासाहेब पटोले यांच्या जन्मदिनानिमित्ताने आरोग्य कर्मचारी कोरोना योद्धांच्या सन्मान हा उपक्रम राबविण्यात आला.याबाबत अनेकांनी दुरध्वनीच्या माध्यमातून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून आनंद व्यक्त केला.व आय.पटोले साहेबांच्या दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.आध्यात्मिक, सामाजिक,शैक्षणिक कार्यासह,राजकारणात सतत अग्रेसर राहून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणारे,गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सतत संघर्ष,गरजूंना वेळोवेळी मदत,सर्वच कार्यकर्त्यांना बळ,मान आणि सन्मान देवून हजारो कुटूंबांना लोकसेवेच्या माध्यमातून दिलासा देणारे सर्वांना आपलेसे वाटणारे नानाभाऊ यांचा दि.५ जून रोजी जन्मदिवस आहे.दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला जातो.संपूर्ण देशात कोरोना या साथ रोगाने थैमान घातले.यावर्षी कोरोना महामारीचे संकट कमी होत आहे.मात्र अजून ते संपलेले नाही अशा परिस्थितीत वाढदिवसानिमित्त बॅनरवरील खर्च टाळून कोरोना संबंधित काहीतरी विधायक कार्य केले पाहिजे या भूमिकेतून कोरोना योध्द्यांचा सन्मान करून तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.विधायक हेतूने यावर्षी आपण आपल्या शुभेच्छा आ.नानाभाऊ यांना कोरोना योध्यांच्या सत्काराच्या माध्यमातूनच देत आहोत..!

-राजेसाहेब देशमुख (जि.प.सदस्य,बीड.)