बीड – पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे दि 8/ 6/2021 रोजी रात्री 12 च्या सुमारास जबर दरोडा पडला असून या मध्ये तीन जण जखमी झाले असून एकास धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत सदर जखमी रवींद्र शहादेव शीरसट यांना बीड येथील लोटस हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले आहे तर त्यांचे आई-वडील सखुबाई शादी शिरसाट वय 60 महादेव निवृत्ती शिरसाट वय वर्षे 65 यांना किरकोळ जखमी झाले असून ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत यावेळी घटना घडलेली समजताच डीवायएसपी विजय लगारे साहेब पाटोदा पोलीस स्टेशन पी आय महेश आंधळे आपल्या सर्व सहकाऱ्यांसह चुंबळी येथे हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास चालू आहे.