पाटोदा तालुकाबीड जिल्हा

पाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथील रहीवाशी बाबासाहेब जयप्पा ढेकळे यांची पी.टी.आर.मिळकत क्र 179/ 2 जागा सन 1990 पासुन त्यांच्या नावावर असुन ताब्यात आहे तरी चालु रेकॉर्ड प्रमाणे 179/ 2 ही जागा बाबासाहेब जयप्पा ढेकळे यांना न विचारता सरपंच व ग्रामसेवकांनी 2013/ 2014 या साली ञैस्ताच्या (दुसर्याच्या) नावावर करण्याची करामत केली आहे.
त्या जागेची नोंद रद्द करण्यात यावी असे पण बाबासाहेब ढेकळे यांनी अर्जात नमुद केले आहे.
प्रकरण यावरती न थांबता ही जागा दुसर्याने तिसर्याला विकली आहे. 9/3/2021 रोजी रजिस्टरी करण्यात आली आहे त्याची पण नोंद रद्द करण्यात यावी असे गटविकास अधिकारी,तहसिल कार्यालय,उपविभागिय कार्यालय पाटोदा यांना दिलेल्या अर्जात नमुद केले आहे .
हा सर्व महाप्रताप करणारा ग्रामसेवक बदली करून आपल्या गावी विदर्भात गेला आहे तरी त्याच्यावर काय कारवाई होती त्या कड़े सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही अनुचित प्रकार घड़ल्यास त्याला ग्रामपंचायत जबाबदार राहील असे पण अर्जात नमुद केले आहे.

त्यावेळेस असणारा ग्रामसेवक याच्यावर धारा 164 भारतीय दंड़ प्रक्रीया संहीता नुसार कारवाई करण्यात येईल.बदली करून गेला असला तरी त्याच्यावर कारवाई करता येते.
― प्रभाकर अनंञे
(गटविकास अधिकारी पाटोदा )