ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात काँग्रेसचे जनआंदोलन-जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांची माहिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी):
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी म्हणजेच “सामाजिक न्याय दिनी” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अघोषित आणीबाणी विरोधात तसेच ओबीसींच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमेटीकडून शनिवार,दिनांक २६ जून रोजी बीड जिल्ह्यात सर्वञ जनआंदोलन करण्यात आले.या आंदोलनात युवक,महिला,काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.
प्रारंभी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अंबाजोगाईतील राजर्षी छञपती शाहू महाराज चौक येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आहे.यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की,काँग्रेस नेते खा.राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ.नानासाहेब पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उपाध्यक्ष मोहनजी जोशी यांचे आदेशानुसार आज २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अघोषित आणीबाणी विरोधात बीड जिल्ह्यातील गाव,शहर,तालुका येथे जनआंदोलन करण्यात येत आहे.तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्याचे पाप देखील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचेच आहे.सुप्रीम कोर्टाने ओबीसींची आकडेवारी केंद्रातील भाजप सरकारकडे मागितली होती.परंतू,त्यांनी ती दिली नाही,त्यामुळेच ओबीसींचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे.याला सर्वस्वी महाराष्ट्रातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहे.या विरोधात देखील आज रोजीच्या आंदोलनात विरोध दर्शविण्यात येत आहे.गत दीड वर्षापासून देश कोरोना महामारीचा सामना करीत आहे.या काळात शेतकरी,कष्टकरी,हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे.आज उद्योगधंदे,व्यवसाय बंद पडल्याने लाखो लोक बेरोजगार होवून देशोधडीला लागले आहेत.भाजपाच्या दिशाहीन नेतृत्वामुळे देश एका अभूतपूर्व संकटाचा सामना करीत आहे.कोरोनामुळे मोठी हानी होऊ शकते असा इशारा देत वेळीच उपाययोजना करा अशी सुचना राहुलजींनी देशाच्या पंतप्रधानांना केली होती.परंतू,हा जबाबदारीचा सल्ला न ऐकता देशाला स्वतःच्या हेकेखोरपणाने मरणाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने केले.अशा संकटसमयी देशाच्या नागरिकांसोबत खंभीरपणे उभे राहणे हीच काँग्रेसची खरी संस्कृती आहे.आज देशाला वाचवायचे असेल तर काँग्रेसच्या विचारांची आणि राहुलजींच्या दूरदृष्टीपणाची गरज आहे असे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यावेळी म्हणाले.जनआंदोलन प्रसंगी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी “मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणीचा जाहीर निषेध”,”ओबीसींच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे”, “प्रत्येकावर होतेय दडपशाही हीच तर मोदी सरकारची हुकूमशाही” आदी घोषणांचे नारे देवून परीसर दणाणून सोडला.तसेच यावेळेस नरेंद्र मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणी विरोधात अॅड.विष्णुपंत सोळंके यांनी उपस्थितांना “संविधान रक्षणाची शपथ” दिली.काळे झेंडे घेऊन आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करणा-या घोषणा देत बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून जनआंदोलन करण्यात आले.आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर केला.तसेच कोविड १९ पार्श्वभूमीवर शासन निर्देशांचे पालन ही केले असल्याचे दिसून आले.जनआंदोलनात बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननिय आजी,माजी प्रदेश,जिल्हा,तालुका,शहर पदाधिकारी यांचेसह बीड जिल्हा काँग्रेस,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस, सेवादल,अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्यांक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सन्माननिय नेते,जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष,सर्व शहराध्यक्ष,नगरसेवक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले होते त्याला बीड जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अंबाजोगाई येथे झालेल्या जनआंदोलनात बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके,जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,अंबाजोगाई तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,राणा चव्हाण,सुनिल वाघाळकर,गणेश मसने,सज्जन गाठाळ,अनिस मोमीन,भारत जोगदंड,महेबूब गवळी,अशोक देवकर,पांडुरंग देशमुख,शेख मुख्तार, सचिन जाधव,रफीक गवळी,दिनेश घोडके,विशाल पोटभरे,जावेद गवळी,विजय कोंबडे,अकबर पठाण,शेख खलील,शेख अकबर,सुधाकर टेकाळे,प्रताप देवकर,अमोल मिसाळ,महेश वेदपाठक,काझी शाकेरभाई,शरद काळे,अजीम जरगर आदींसह काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननिय आजी,माजी प्रदेश,जिल्हा,तालुका पदाधिकारी सहभागी झाले होते.कोवीड-१९ संदर्भातील नियम पाळून आंदोलन करण्यात आले.या जनआंदोलनात बीड जिल्ह्यातील बीड,अंबाजोगाई,धारूर,वडवणी,माजलगाव, गेवराई,आष्टी-पाटोदा-शिरूर व परळी वैजेनाथ येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महिला,युवक,सेवादल,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्यांक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सन्माननिय नेते,जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष,नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.
*काँग्रेस पक्षाने भारतात लोकशाही रूजवली :-*
काँग्रेस पक्षाची ‘आयडिया ऑफ इंडिया’ ही कल्पना म्हणजे राष्ट्रीय एकात्मता,सर्वधर्मसमभाव,सामाजिक समता,लोकशाही मूल्ये यांची पाठराखण करणे अशी आहे.काँग्रेस पक्षाने देशात लोकशाही रूजवली.प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य दिले,न्याय व्यवस्थेचा आदर ठेवला,निवडणूक आयोगावर अंकुश ठेवला नाही.त्यामुळेच जगभर भारताची शान वाढली.’सर्वांत मोठी लोकशाही’ असा गौरव आपला झाला.परंतू,मागील दीड वर्षापासून देश कोरोना या महामारीचा सामना करीत आहे.या काळात शेतकरी,कष्टकरी,हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे.आज उद्योगधंदे,व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले आहेत,देशोधडीला लागले आहेत.भाजपाच्या दिशाहीन नेतृत्वामुळे देश आज एका अभूतपूर्व अशा संकटाचा सामना करीत आहे.स्वतःच्या हेकेखोरपणाने भारताला मरणाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने केले आहे.पंतप्रधान मोदी हे कोरोना काळात ही जनतेच्या जिवीताशी खेळत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: पंतप्रधानपदी रहाण्यासाठी देशद्रोहाच्या कायद्यांचा बेलगाम वापर करीत असून,देशाची आर्थिक,औद्योगिक,कृषी,शैक्षणिक,आंतरराष्ट्रीय संबंध अशा सर्वच क्षेत्रांत देशाची घसरण करणाऱ्या मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणीचा प्रत्येकाने धिक्कार केला पाहिजे.लक्षात ठेवा,पेट्रोल दरवाढ,महागाई,लस उपलब्धता याबाबत अकार्यक्षमता,चीनचे आक्रमण या कशाही बाबतीत आपण मोदी सरकार विरूद्ध आवाज उठवला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची अघोषित आणीबाणी आपल्या दारातही येऊ शकेल.यासाठीच मोदी सरकारला प्राणपणाने विरोध करा.
-राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमेटी.)