पाटोदा तालुकाबीड जिल्हाबीड तालुका

मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील समस्याविषयी लिंबागणेशकरांचा रास्ता रोको –डाॅ. गणेश ढवळे

बीड:नानासाहेब डिडुळ― अहमदपुर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा-पाटोदा दरम्यान गतिरोधक बसविण्यात यावेत तसेच हुले कन्स्ट्रक्शनच्या गलथान कारभारामुळे मोरगाव फाटा, मुळुक, लिंबागणेश, वैद्यकिन्ही बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर अपघातात बळी जात असून सदोष बांधकाम तात्काळ दुरूस्त करण्यात यावेत, मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत मागण्यांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव नेकनुर पोलीस ठाणे यांना देण्यात आले. यावेळी प्रशांत क्षीरसागर, तसेच लिंबागणेश पोलीस ठाण्याचे जमादार सुरेश राऊत, एस. पारधी, सानप, आदि पोलीस प्रशासनाचे आधिकारी कर्मचारी हजर होते.
अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान मोरगाव, मुळुक, लिंबागणेश, वैद्यकिन्ही या गावातील बसस्थानकासमोर मोठ्याप्रमाणात अपघात होऊन ब-याच जणांना जीव गमवावा लागला आहे यापुर्वीही या तिन्ही गावात गतिरोधक बसवावेत,तसेच रमलिंग स्ट्रीप, आय ब्लिंकर बसवुन स्पीड लिमिटचे फलक लावणे अशी लेखी तक्रार डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी वरीष्ठ कार्यालयास केलेली असून त्यात कोणतीही सुधारणा झाली नसुन लिंबागणेश याठिकाणी रसत्याचे काही काम सदोष असून त्याची दुरस्ती करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा- पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिवसेना नेते गणेशकाका मोरे, रविंद्रजी निर्मळ, माजी सरपंच बाळासाहेब मुळे,माजी उपसरपंच अशोक जाधव, मुळुकचे सरपंच कृष्णाजी पितळे, सचिन ढास, युवा नेते विक्की आप्पा वाणी, संतोष वाणी ,अभिजीत गायकवाड, अशोकराजे वाणी, अमोल जाधव, अक्षय वायभट, दिनेश वायभट ,नवनाथ येडे ,ओम क्षीरसागर,सचिन ढास, दत्तात्रय ढवळे आदि सहभागी होते.
मागण्या:-
1)मांजरसुंभा- पाटोदा दरम्यान मौजे मोरगाव फाटा, मौजे मुळुक बसस्थानक, लिंबागणेश बसस्थानक तसेच भालचंद्र माध्यमिक विद्यालय, वैद्यकिन्ही बसस्थानक याठिकाणी रमलिंग स्ट्रीप,आय ब्लिंकर बसवुन स्पीड लिमीटचे फलक लावून गतिरोधक बसविण्यात यावेत. तसेच
2)लिंबागणेश बसस्थानकावरील गतिरोधक जाळ्यामुळे दुस-या बाजुचे दिसत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे, आवश्यक ती दुरूस्ती करण्यात यावी.
3)लिंबागणेश बसस्थानक येथे गावात जाताना मुख्यद्वाराजवळ सदोष बांधकाम झाल्याने अपघातात वाढ झाली आहे.
3) लिंबागणेश येथे नानासाहेब वायभट, सतिश वायभट यांच्या दुकानासमोरील नाल्याची सदोष बांधकामामुळे उंची 3-4 फुट जास्त झाल्याने अडचण येत असून तीष दुरूस्ती करण्यात यावी.
4) लिंबागणेश येथिल पथदिवे बंद असल्या कारणाने तात्काळ चालु करावेत.


Back to top button