महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलकडून डॉक्टर्स डे निमित्त अंबाजोगाईत कोरोना योध्द्यांचा सन्मान ,बांधिलकी जोपासत बीड काँग्रेस कमेटीकडून रक्तदान

अंबाजोगाई: कोरोनाच्या संकटात देवदूत बनून रूग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांचे प्राण वाचविणा-या व ग्रामीण आरोग्याला बळकटी देणा-या कोरोना योध्द्यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल कडून "डॉक्टर्स डे" निमित्त अंबाजोगाईत सन्मान करण्यात आला.तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या आवाहनानुसार बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून शिबीर आयोजित करून रक्तदान करण्यात आले अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलच्या वतीने बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकिय रूग्णालयात गुरूवार,दिनांक १ जुलै रोजी डॉक्टर्स डे निमित्त कोरोना योध्द्यांचा सन्मानपत्र व शाल देऊन तसेच फेटा बांधून यथोचित सेवागौरव करण्यात आला.यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,स्वारातीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे, सत्कारमूर्ती डॉ.संजय चव्हाण,डॉ.विशाल लेडे,डॉ.अनिल मस्के, डॉ.ईरा ढमढेरे,डॉ.अस्मिता उराडे,डॉ.एम.एच.कांबळे,डॉ.अमित लोमटे,डॉ.प्रमोद दोडे यांच्यासह प्रमुख अतिथी डॉ.विश्वजीत पवार,इतर डॉक्टर बांधव तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,आरोग्य सेलचे जिल्हाध्यक्ष शेख मुख्तार,राणा चव्हाण,कचरूलाल सारडा,खालेद चाऊस,सुनिल वाघाळकर,महेबूब गवळी,भारत जोगदंड,दिनेश घोडके,सचिन जाधव,अकबर पठाण,अजीम जरगर,शाकेरभाई काझी,अमोल मिसाळ यांच्यासह काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की,कोरोना संकटकाळात अंबाजोगाईत
डॉक्टर बांधव व वैद्यकीय सेवेतील कर्मचारीवृंद यांनी अतिशय मोलाचे काम करून आपण वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून रूग्णांची जी सेवा करीत आहात,ती अत्यंत गौरवास्पद व अतुलनीय आहे.कोवीड-१९ या वैश्विक महामारीच्या काळामधील आपले कार्य हे विशेष उल्लेखनीय आहे.आपल्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन आज १ जुलै "डॉक्टर्स डे" निमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने (डॉक्टर सेल) सन्मानपत्र देऊन आपणांस सन्मानित करण्यात येत आहे त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन,आपली सेवा अशीच अविरत सुरू राहो या शुभ कामनासह आ.नानाभाऊ पटोले (अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी),ना.अमित देशमुख (वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य,मुंबई),डॉ.मनोज रांका (अध्यक्ष,डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी) यांच्या वतीने आम्ही आपला गौरव करीत आहोत असे जिल्हाध्यक्ष मोदी म्हणाले.तर याप्रसंगी बोलताना प्रभारी अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे यांनी काँग्रेस पक्ष व जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे सातत्यपूर्ण सहकार्य व मदतीसाठी आभार मानले.पुढील काळात ही रूग्णसेवेसाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत असे प्रभारी अधिष्ठाता डॉ.धपाटे यांनी नमुद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी तर सुञसंचालन प्रा.अनंत कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे यांनी मानले.

बांधिलकी जोपासत बीड काँग्रेस कमेटीकडून रक्तदान
================
राज्यामध्ये उपलब्ध असलेला रक्तसाठा अतिशय कमी आहे.जनतेने स्वयंस्फुर्तीने रक्तदान करावे या सन्माननिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने बीड जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुढाकाराने यावर्षीही गुरूवार,दिनांक १ जुलै २०२१ रोजी आयोजित रक्तदान शिबीरात १९ जणांनी उत्सफुर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.काँग्रेस पक्षाने मागील दीड वर्षापासून संपुर्ण लॉकडाऊन कालावधीत आज तारखेपर्यंत सुमारे ११०० जणांनी वेळोवेळी झालेल्या शिबीरात रक्तदान केले आहे.या शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ.मंजुषा देशमुख,शेख अन्वर,उबेद मिर्झा यांचे सहकार्य लाभले.या शिबीराच्या यशस्वितेसाठी राजकिशोर मोदी मित्र मंडळ तसेच बालाजी शिक्षण प्रसारक मंडळातील प्राचार्य नंदकिशोर फुलारी,डॉ.संतोष तरके,मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड,मुख्याध्यापक आनंद टाकळकर,समन्वयक विजय रापतवार,विनायक मुंजे,प्रविण शेळके,कृष्णा झांबरे आदींनी पुढाकार घेतला.शिबीरानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्र ही देण्यात आले.

Previous post ग्रामीण भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावाची
Next post बोर्डी नाला प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करा