माजी मुख्यमंञी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून वृक्षारोपण -राजकिशोर मोदी

Last Updated by संपादक

अंबाजोगाई (वार्ताहर):
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंञी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून शहरात २५० ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.तसेच वृक्ष संगोपन व संवर्धन याला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील काळात अंबाजोगाई शहर व परीसरात वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती देवून हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंञी वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अभिवादन केले.

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीकडून स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयासमोर गुरूवार,दिनांक १ जुलै रोजी हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंञी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.सामाजिक बांधिलकीतून अंबाजोगाई शहर व परिसरातील संत भगवान बाबा चौक ते साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे चौक या दरम्यान रस्त्याच्या एका बाजूने २५० विविध वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली.वृक्षारोपनाची सुरूवात बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते करण्यात आली.या माध्यमातून प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी एक तरी वृक्षारोप लावावे असा मौलिक संदेश दिला.यावेळी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की,अंबाजोगाई शहर व परीसर हरित करावयाचा आहे.त्याच दिशेने पावले टाकत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे आपला शेतकरी बांधव
स्वावलंबी व्हावा यासाठी तसेच कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण राबवित आहे,असे सांगून मोदी यांनी कृषी दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.अभिवादन संदेशात मोदी म्हणतात की,महाराष्ट्राला अन्न धान्याच्या उत्पादनात स्वयंपुर्ण करण्याचा वसंतराव नाईक यांचा निर्धार होता आणि तो त्यांनी कुशलतेने पूर्ण केला.ते कृषीतज्ज्ञ होते.त्यांनी शेती आणि सिंचन क्षेत्राच्या आपल्या अभ्यासाचा राज्याच्या धोरणात प्रभावीपणे उपयोग केला.यातूनच सिंचन क्षेत्र वाढले आणि शेती उत्पादनात महाराष्ट्र स्वयंपूर्ण ठरला.त्याअर्थाने ते महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे प्रणेते आहेत.कृषीमंत्री,महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपला असा ठसा उमटवला आहे.त्यांनी महाराष्ट्राला समृद्ध आणि वैभवशाली करण्याची पेरणी केली आहे.त्याच दिशेने शेतकरी स्वावलंबी व्हावा यासाठी काँग्रेसचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण राबवित आहेत.यातून महाराष्ट्र,बीड जिल्हा आणि अंबाजोगाईला सुजलाम-सुफलाम व हरीत करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू या.हेच वसंतराव नाईक यांना आजच्या कृषी दिनी विनम्र अभिवादन अशा शब्दांत राजकिशोर मोदींकडून गौरव करण्यात आला.याप्रसंगी अंबाजोगाई काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,सुनिल वाघाळकर,राणा चव्हाण,कचरूलाल सारडा,भारत जोगदंड,सचिन जाधव,अजीम जरगर आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.वृक्षारोपणासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

सगळे मिळून करू अंबाजोगाईच्या पर्यावरणाचे संवर्धन :-
==================
अंबाजोगाई शहर व परीसराला हिरवाईने नटविणे,स्वच्छ सुंदर आणि हरित करणे,पर्यावरण संवर्धन व रक्षणार्थ जनजागृती करण्यात येत आहे तसेच अंबाजोगाईतील प्रमुख रस्त्यांवर,सार्वजनिक व खाजगी मोकळ्या मैदानात आणि जागेवर गरजेनुसार वृक्षारोपण केले पाहिजे.वृक्षारोपणासाठी अंबाजोगाई नगर परिषदेने यापूर्वीच पुढाकार घेतलेला आहे.आता अंबाजोगाईतील शाळा,महाविद्यालय व शैक्षणिक संस्था,प्रतिष्ठाने,गणेश मंडळे,बँका,बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,सामाजिक संघटना,व्यापारी बांधव,विविध व्यावसायिक,रोटरी क्लब आणि ज्या नागरीक व समाज घटकांना शक्य आहे त्यांनीही पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे,वृक्ष संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे,पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय,औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील उद्दिष्ट ठेवून सक्रिय सहभाग घ्यावा,दररोज प्रदूषण वाढत आहे.हवामान बदलत आहे.आणि या सर्व स्थितीला आपली जीवनशैलीच कारणीभूत आहे.तसेच वाढते शहरीकरण व नागरीकीकरण यामुळे प्रत्येक माणसाने वृक्षारोपण करून संगोपन व संवर्धन यासाठी पुढाकार घ्यावा.यावर्षी मी स्वता: २०० वृक्ष रोपांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे.नुकतेच ५० वृक्षारोपांची लागवड ही केली आहे.अंबाजोगाईतील नागरिकांनी देखिल यावर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणाकरीता पुढाकार घ्यावा.

-राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमेटी.)