पाटोदा तालुकाबीड जिल्हा

शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची नफरवाडी शाळेस सदिच्छा भेट ; ‘बाला’ उपक्रमाची पाहणी करत केले समाधान व्यक्त

पाटोदा:नानासाहेब डिडुळ―
दि.१ तालुक्यातील आय एस ओ मानांकित जि.प.प्रा.शा.नफरवाडीस बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मा. श्रीकांत कुलकर्णी साहेब यांनी सदिच्छा भेट दिली.
शाळेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी शेळके साहेब यांनी त्यांचा सत्कार केला.
यानंतर कुलकर्णी साहेबांनी ‘बाला’ (Building As a Learning Aid) उपक्रमाची तसेच माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची पाहणी करून त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
शाळेने केलेल्या कामाबद्दल सर्व शिक्षक आणि गावकरी यांचे तोंडभरून कौतुक केले.
कोरोना कालावधी पूर्वी व कोरोना कालावधीत शाळेने राबवलेल्या उपक्रमाची पीपीटी पाहून समाधान व्यक्त केले.
या भेटीदरम्यान पाटोदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आ.शेळके साहेब , जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी आ. बोंदार्डे साहेब ,आ.चाटे सर विषय तज्ञ बीड ,पारगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आ.बिनवडे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री खंडागळे सर ,शाळेतील शिक्षिका श्रीम.उपदेशी मॅडम,श्रीम.माने मॅडम,श्रीम.काकडे मॅडम, व श्रीम.वावरे मॅडम उपस्थित होते .

Back to top button