पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

ढाळेवाडी येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पाटोदा:नानासाहेब डिडुळ―
तालुक्यातील ढाळेवाडी
येथील तरुण शेतकऱ्याने रहात्या घराच्या आडुला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि.५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. दादासाहेब साहेबराव ढवळे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, ढाळेवाडी येथील दादासाहेब ढवळे यांनी आपल्या घराच्या आडुला दोरखंड बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुटुंबीयांना या घटनेची माहिती होताच त्यांनी फासावरुन त्यास उतरुन तात्काळ पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरानी तपासणी करुण मृत घोषीत केले.

मयताचा भाऊ आंकुश साहेबराव ढवळे यांच्या खबरीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यु ची नोंद करुन अधिक तपास पो.ना. कृष्णा डोके हे करीत आहेत.आत्महत्येचे कारण समजु शकले नाही.