सोयगाव-गलवाडा रस्त्यावर पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांवर हल्ला ;पाच गंभीर ,गलवाडा येथील घटना

सोयगाव,दि.१२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―

सोयगाव वरून शासकीय व शेतीचे कामे आटोपून घराकडे जातांना पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल सात जणांवर हल्ले चढवून लचके तोडून जखमी केल्याची घटना सोयगाव-गलवाडा रस्त्य्यावर गलवाडा गावाजवळ घडली यामुळे गावात दहशत पसरली होती.त्यापैकी गंभीर पाच जणांना तातडीने जळगावला हलविण्यात आले आहे .मात्र या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी कोणतीही यंत्रणा घटना स्थळी दाखल झाली नव्हती त्यामुळे गलवाड्यातील घरे दर्बंद झाली होती.

सोयगाव-गलवाडा रस्त्यावरून वाहनाने घराकडे जातांना पाच जणांना तर शेतातून घरी जातांना दोन जणांना अशा सात जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने लक्ष केंद्रित करून जखमी केले आहे.यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आनंदा इंगळे(वय ५७)नंदाबाई औरंगे(वय ३५)लीलाधर इंगळे(वय ७१)सोनाली वाघ(वय २४)सर्व रा.गलवाडा आणि अलीखा पठान(वय ५० रा.वेताळवाडी)या पाच जणांना गंभीर जखमी केले आहे.या घटनेत या पाच जणांना पायांना,हातांना आणि पोटावर हल्ला चढवून गंभीर केले असून यांना तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्यांचेवर डॉ.केतन काळे,गोपाल देहाडे,आदींचं पथकाने प्राथमिक उपचार करून या पाच जणांना जळगावला हलविण्यात आले आहे.

गलवाडा गावात दहशत-

रस्त्यावरून जाणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवून गंभीर जखमी करणाऱ्या पिसाळलेला कुत्रा मोकाट फिरत असल्याने गावात दहशत पसरली असून या घटनेत दोन महिलांचा गंभीर जखमीमध्ये समावेश आहे.

मोकाट कुत्र्याला आवर घाला-

सोयगाव-गलवाडा रस्त्यावरून वेताळवाडी,गलवाडा आणि सिल्लोड तालुक्याशी जोडणाऱ्या या रस्त्यावरून वर्दळ असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे या मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याला आवर घालण्याच्झी मागणी होत आहे.

Previous post अंबाजोगाई पीपल्स बँकेकडून शिक्षण क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सेवापुर्तीनिमित्त गौरव
Next post घोसला ता.सोयगाव येथे वीस मिनिटाचा ढगफुटीचा पाऊस ;कपाशी पिकांचे नुकसान ,ठिबक सिंचन वरील कपाशी आडव्या