केंद्रातील मोदी सरकारचा निषेध ; सर्वसामान्यांना जगणे झाले कठीण
अंबाजोगाई (वार्ताहर):
पेट्रोल,डिझेल,स्वयंपाकाचा गॅस,खाद्यतेल आदी जीवनावश्यक वस्तू महागल्या असून या मुद्द्यावरून कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. केंद्रातील मोदी सरकारने निर्माण केलेल्या कृत्रिम महागाई विरोधात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली दहा दिवसांचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत असून या निमित्ताने बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून अंबाजोगाईत सोमवार,दिनांक १२ जुलै रोजी सायकल यात्रा काढण्यात आली.काँग्रेसच्या सायकल यात्रेला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळाला.
अंबाजोगाईत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकास अभिवादन करून सायकल यात्रा नेण्यात आली.महाराष्ट्र
प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष डॉ.जितेंद्र देहाडे,मराठवाडा समन्वयक सिद्धार्थ हत्तीअंबिरे,जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्यासह स्वतः सायकल चालवत नेतृत्व केले.पुढील काही दिवसात राज्यस्तरावर सायकल यात्रा,पेट्रोल पंपावर इंधन दरवाढी विरोधात सह्यांची मोहीम आदी मार्गाने मोदी सरकारचा निषेध नोंदविला जाणार आहे.खाद्यतेल,इंधन, स्वयंपाकाचा गॅस अशा जीवनावश्यक वस्तूंच्या भावात वाढ करून मोदी सरकारने अच्छे दिन ऐवजी बुरे दिन आणले असे महिला म्हणू लागल्या आहेत.भाजपला मते दिल्याचा पश्चाताप आज भारतीय जनतेला होत आहे.सामान्य माणसाचा हा आवाज मांडण्यासाठी पुढील काळात काँग्रेस आंदोलनांचा धडाका उडवेल असे जिल्हाध्यक्ष मोदी यांनी सांगितले.तर यावेळेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष डॉ.जितेंद्र देहाडे म्हणाले की,काही महिन्यांपासून पेट्रोल,डिझेल,गॅस सिंलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत.यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.केंद्रातील मोदी सरकारचे जनहित विरोधी धोरण याला कारणीभूत आहे.महागाई विरोधात जे आंदोलन करत होते.तेच सरकार आज केंद्रात ७ वर्षांपासून सत्तेवर आहे.तेव्हा पेट्रोल, डिझेल,केरोसीन आणि गॅस सिंलिडरचे दर होते.तेच दर आजघडीला गगनाला भिडले आहे.वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला जगण्याचा अधिकार द्यायचा आहे,केंद्रात सत्तासुख भोगत असलेल्या भाजप सरकारला आता सत्तेतून हटविण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन डॉ.जितेंद्र देहाडे यांनी केले.तर बीड जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आयोजित सायकल रॅलीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष मोदी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर रोष व्यक्त करीत कधी नव्हे एवढी इंधन दरवाढ आणि सिंलिडरचे दर सर्वसामान्यांना दाखविण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे.अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून बुरे दिन जनतेला पाहावे लागत आहेत.त्यामुळे केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारला धडा शिकविण्याची वेळ आल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
राजकिशोर मोदी म्हणाले.इंधनावरील या महागाईच्या निषेधार्थ ही सायकल यात्रा काढण्यात आली.या यात्रेचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसूचित विभागाचे कार्याध्यक्ष आणि निरीक्षक डॉ.जितेंद्र देहाडे,मराठवाडा समन्वयक सिद्धार्थ हत्तीअंबिरे,जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी,प्रशांत पवार,महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके,जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,माणिक वडवणकर,राणा चव्हाण,सुनिल वाघाळकर,गणेश मसने,सज्जन गाठाळ, अनिस मोमीन,ॲड.घोगरे,भारत जोगदंड,ॲड.बेग,महेबूब गवळी,अशोक देवकर,पांडुरंग देशमुख,शेख मुख्तार, सचिन जाधव,रफीक गवळी,दिनेश घोडके,अश्विन सावंत,शेख खलील,जावेद गवळी,विजय कोंबडे, अकबर पठाण,शेख अकबर,सुधाकर टेकाळे,प्रताप देवकर,अमोल मिसाळ,महेश वेदपाठक,काझी शाकेरभाई,शरद काळे,अजीम जरगर आदींसह जनआंदोलनात बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननिय आजी, माजी प्रदेश,जिल्हा, तालुका,शहर पदाधिकारी यांचेसह बीड जिल्हा काँग्रेस,युवक काँग्रेस,सेवादल, अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्यांक सेल, ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सन्माननिय नेते, जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष,सर्व शहराध्यक्ष,नगरसेवक यांनी सहभागी झाले होते.कोवीड-१९ संदर्भातील नियम पाळून आंदोलन करण्यात आले.या जनआंदोलनात बीड जिल्ह्यातील बीड,अंबाजोगाई,धारूर,वडवणी,माजलगाव, गेवराई,आष्टी-पाटोदा-शिरूर व परळी वैजेनाथ येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवक,सेवादल,अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्यांक सेल, ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सन्माननिय नेते, जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष,नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते.बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई येथे झालेल्या जनआंदोलनाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.
महागाईच्या विरोधात कॉंग्रेसची अनोखी सायकल यात्रा :-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार विरोधात बीड जिल्ह्यात सर्वत्र हे आंदोलन करण्यात आले.अंबाजोगाईत महामानवांना अभिवादन करून भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून या सायकल रॅलीस प्रारंभ झाला.पुढे ही रॅली छञपती शिवाजी महाराज चौक,सदर बाजार,संत रविदास चौक,गांधीनगर,गुरूवार पेठ,मंडी बाजार, पाटील चौक,कुत्तरविहीर,भारतरत्न.बाबासाहेब आंबेडकर चौक,स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गे काढण्यात आलेल्या सायकल रॅलीचा समारोप रिलायन्स पेट्रोल पंपासमोर करण्यात आला.सुमारे ७५० सायकलींसह महागाईचा निषेध करणारे फलक,बँड बाजा लावून,घोडे आणि बैलगाड्या घेवून बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचेसह काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते हे सायकल यात्रेत सहभागी झाले होते.
घोषणांनी शहर दुमदुमले :-
या जनआंदोलन प्रसंगी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी “मोदी सरकारने केलेल्या इंधन दरवाढ,महागाई यांच्या विरोधात जाहीर निषेध करणा-या “नको नको मोदी सरकार पुन्हा नको”, “देशाच्या प्रगतीपुस्तकात मोदी सरकार नापास” “चले जाओ चले जाओ,जनताविरोधी मोदी सरकार चले जाओ”, “मोदी सरकारचा जनतेला संदेश – पेट्रोल महागले,पायी चाला,महागाई झाली
कमी जेव्हा,”स्वातंत्र्यानंतरचे सर्वांत अकार्यक्षम सरकार”, “देश के जनता की एक ही पुकार गद्दी छोड़ो मोदी सरकार”, “सन-2014 अच्छे दिन आएँगे सन-2021 बुरे दिन आए हैं”, “देश के जनता की बड़ी भूल,चुन के दिया कमल का फूल.” या घोषणांचे नारे देवून शहर दणाणून सोडले.पक्षाचे झेंडे व फलक घेऊन महागाई वाढ करणा-या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करणा-या घोषणा देत बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून जनआंदोलन करण्यात आले.आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर केला.
भरमसाट महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे झाले मुश्कील :-
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल,डिझेल,गॅसच्या किंमती भरमसाट वाढविल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.याचा निषेध बीड जिल्ह्यात कॉंग्रेस द्वारा शुक्रवारी सर्वत्र सायकल रॅली काढून करण्यात आला.कॉंग्रेस शासनाच्या काळात सिलिंडरचे दर ३४४/- रूपये होते,आता ते ९४२/- वर पोहोचले आहेत.त्यावरची सबसिडी देखील नाहीशी झाली आहे.
-राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमेटी.)