आष्टी तालुकाकडाबीड जिल्हा

डोंगरगण येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा

कडा/ प्रतिनिधी:शेख सिराज― दि. 11 जुलै रविवार रोजी आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आष्टी पंचायत समितीचे माननीय गट विकास अधिकारी श्री मुंढे साहेब ,अंभोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री कुकलारे साहेब, डोंगरगण गावचे सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ व सर्व तरुण वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित सर्व अतिथींचे रोप देऊन स्वागत करण्यात आले . कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गटविकास अधिकारी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले आणि या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले येणाऱ्या काळात वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे आणि आपण सर्वांनी ती जोपासली पाहिजे .या वृक्षप्रेमी युवकांचे माननीय साहेबांनी कौतुक केले .असेच उपक्रम राबवण्यासाठी प्रत्येक गावातील युवकांनी पुढे आले पाहिजे असे आव्हान त्यांनी सर्व ग्रामस्थांना केले. कार्यक्रमाला उपस्थित अंभोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय कुकलारे साहेब यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सतीश चव्हाण यांनी केले तर काकासाहेब चव्हाण यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्रामस्थांचे आभार मानले.

Back to top button