पाटोदा तालुकाबीड जिल्हा

पाटोदा: गटविकास अधिकाऱ्याने लाच मागितल्या प्रकरणी चौकशी करून कारवाही करण्याच्या मागणीसाठी सौ.छाया नवनाथ सानप करणार आमरण उपोषण

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― ग्रा.पं. कार्यालय सौताडा येथील झालेल्या आनुसुचित जाती घटक योजने अंतर्गत कामाच्या एकुण १७ लक्ष रुपये देयक पोटी ५% रक्कमेची रु ८५,०००/- रु एवढी मागणी गटविकास अधिकारी पं. स. पाटोदा श्री अनंतरे पी डी यांनी केली.तर सानप यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे संबंधीताना मोजमाप पुरतीका संचीका अवैध्यरीत्या अडीच महिन्यापासून ताब्यात ठेवलेल्या आहेत.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे संबंधीतांना आदेशीत करून योग्य ती कायदेशीर कार्यवाहीची मागणी देखील सानप यांनी केली आहे. संबंधीत कर्मचारी यांचे वर कार्यवाही न झाल्यास दिनांक १५/०७/२०२१ वार गुरुवार या दिवशी जि.प.बीड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन सौ. छाया नवनाथ सानप मु.पो.सौताडा ता. पाटोदा जि.बीड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.बीड यांना दिले आहे.