पाटोदा तालुकाबीड जिल्हा

लाच घेताना बांधकाम विभागाचा वरीष्ठ लिपीक लाचलुचपत विभागाच्या ताब्यात

बीड़:नानासाहेब डिडुळ— आष्टी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकास 6 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.१५) पकडले.आष्टीमध्ये ही कारवाई करण्यात आली.
अंबादास फुले असे त्या वरिष्ठ लिपिकाचे नाव असून नळकांडी पुल व खडीकरणाचे काम पूर्ण केल्यानंतर या कामाचे बिल काढण्यासाठी अंबादास फुले यांनी तक्रारदाराकडे 6 हजार लाचेची मागणी केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आष्टीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. यावेळी लाच घेताना फुले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील,पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी,श्रीराम गिराम,राजेश नेहरकर,भरत गारदे आदींनी पार पाडली.