आमदार सुरेश आण्णा धस यांना खुलेपत्र !

बीड:नानासाहेब डिडुळ― आदरणीय आ.सुरेश आण्णा धस यांना सस्नेह नमस्कार
पत्रास कारण की आपण आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितिनजी गडकरी याची भेट घेऊन बीड ते अहमदनगर-पुणे हा चौपदरी रस्ता करणार असल्याचे फेसबुकवर पाहीले आणि आपणास पत्र लिहीण्यास बसलो...पुण्याच्या ठिकाणी बीडची मुलं शिकताहेत, त्यांच्यासाठी कमीतकमी वेळेत सोय व्हावी ही तुमची ईच्छा सुद्धा अगदी बरोबर आहे...
पण आण्णा काही प्रश्न मनात आहेत, 20 वर्षापासून आपण पाटोदा -आष्टी-शिरूर मतदार संघातील राजकारण करता आहात, मध्यंतरी काही वर्ष आपण मदत व पुनर्वसन राज्यमंत्री होतात, उत्तराखंड येथील पुरग्रस्तांसाठी आपण मोलाचे कार्य केले आम्ही त्याचे भरभरून कौतुक सुद्धा केले,
गेल्यावर्षी वडवणी तालुक्यातील निमगाव खळवट याठीकाणी चप्पुद्वारे प्रवास करताना 3 जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला, आपण त्याठीकाणी भेट देऊन चप्पुवरून प्रवास केलात, विधिमंडळात आवाज उठवणार म्हणून दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्या...असो...

पाटोदा तालुक्यातील शिंदेवस्ति(गारमाळ)वरील ग्रामस्थांना सावत्रपणाची वागणुक का आण्णा??

आपलाच मतदारसंघ असलेल्या पाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्ति (गारमाळ)गेल्या 20 वर्षापासून चप्पुद्वारे जिवघेणा प्रवास करत असताना आपणास त्यांची दया येत नाही का??त्या ग्रामस्थांना सावत्रपणाची वागणुक कशासाठी आण्णा???
मा. नितिनजी गडकरी यांची आज भेट घेताना शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांचा विचार का केला नाहीत आण्णा, त्याची सोय करण्यासाठी निधी का मागितला नाहीत?? त्यांनी कुठपर्यंत चप्पुवरून जिवघेणा प्रवास करायचाय आण्णा???रस्ता नाही म्हणून 4 थी पुढील शिक्षण सौताड्यामधील शाळेत जाताना तलावातुन जावे लागते म्हणून कित्येक मुलींनी शाळा सोडल्या आण्णा???त्यांचा कधी विचार करणार ??? जमलंच तर बघा आण्णा त्यांच्या रस्त्याची सोय करता आली तर.

―डाॅ.गणेश ढवळे

Previous post पाटोदा: शिंदेवस्तीकर (गारमाळ) 16 ऑगस्टला रामेश्वर साठवण तलावात आंदोलन करणार – डाॅ.गणेश ढवळे
Next post शेतीच्या जुन्या रस्त्याच्या वादातून तरुण शेतकऱ्याची हत्या ;पत्नीही गंभीर ,सोयगाव शहरातील खळबळ जनक घटना