आष्टी:शेख सिराज― आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील दिपक बाबासाहेब डहाळे यांची सर्वशाखीय सोनार युवा सेनेच्या आष्टी तालुका अध्यक्ष पदी संस्थापक अध्यक्ष योगेश शहाणे यांनी निवड केली. दिपक डहाळे हे सध्या आष्टी तालुका युवा सेना कॉलेज कक्ष प्रमुख म्हणून काम करीत असून त्यांचे राजकीय सामाजिक कार्य हे उल्लेखनीय असल्यामुळेच त्यांची सर्वशाखीय सोनार युवा सेनेच्या आष्टी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. समाजाच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या समस्या सोडवणे त्या समस्या सोडवुन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देणे.
समाजाला वेगवेगळया योजनाची माहिती देणे, त्या योजना त्यांच्यापर्यत पोहचुन त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देणे,लोकांना काही शासकिय अडचणी येत असेल त्या अडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे अशी विविध कामे या संघटनेद्वारे केली जातात. त्यांची निवड झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष योगेश शहाणे महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख प्रशांत टाक रवि माळवे मराठवाडा प्रमुख विनोद चिंतामणी जगदीश काजळे अनिल उंबरकर आदींनी अभिनंदन केले आहे.