पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

ब्रम्हगाव-मुगगाव-सावरगावघाट निकृष्ट रस्त्याप्रकरणात पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या ठेकेदार-प्रशासकीय आधिकाऱ्यांवर कारवाईसाठी भगवानबाबांच्या स्मारक स्थळी आंदोलन ― डॉ.गणेश ढवळे

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील ब्रम्हगाव-मुगगाव-सावरगावघाट(भक्तिगड)निकृष्ट रस्त्याप्रकरणात बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल आकसापोटी ठेकेदार-प्रशासकीय आधिका-यांनी संगनमताने दैनिक कार्यारंभ बीड दैनिकाचे मुगगाव प्रतिनिधी अशोक राजेंद्र भवर यांच्यावरील दाखल खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात येऊन 4 कोटी 43 लाख रूपये किंमतीच्या 8 किमी रस्तादुरूस्तीची गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.26 जुलै सोमवार रोजी सावरगावघाट (भक्तिगड)येथील भगवानबाबांच्या समाधीस्थळी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन उपविभागीय आधिकारी पाटोदा, तहसिलदार पाटोदा, यांना देण्यात आले आहे.

दि.14जुन रोजी दैनिक कार्यारंभ बीड दैनिकाचे मुगगाव प्रतिनिधी अशोक राजेंद्र भवर यांनी “सावरगाव-मुगगाव-ब्रम्हगाव हा चार कोटीचा रस्ता गेला पाण्यात, संबधितांवर कारवाई करा “या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबधित रस्त्याप्रकरणातील ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाटोदा प्रशासकीय आधिका-यांनी षडयंत्र रचुन पत्रकार अशोक राजेंद्र भवर यांच्यावर मारहाण केल्याबद्दल खोटा गुन्हा दाखल करत रस्त्याप्रकरणात बातम्या प्रसिद्ध करू नये म्हणून धमकावण्यात आले याबद्दल दि.16 जुन रोजी उपविभागीय आधिकारी कार्यालय पाटोदा तथा तहसिल कार्यालय पाटोदा यांच्यासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.

सावरगावघाट (भक्तिगड)येथिल भगवानबाबांच्या स्मारक स्थळी आंदोलन :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड असताना त्यांनी सावरगावघाट(भक्तिगड)येथिल भक्तांची सोय व्हावी म्हणून आ. सुरेश आण्णा धस यांच्या विनंतीवरून ब्रम्हगाव-मुगगाव-सावरगावघाट या रस्ता दुरूस्तीसाठी 4 कोटी 43 लाख रूपयांचा निधी मंजूर करून दिला, परंतु आ. सुरेश आण्णा धस यांच्या कार्यकर्त्यांनी बोगस काम करत निधी हडप केला, या निकृष्ट रस्त्याप्रकरणात विविध तक्रारीवरून दैनिकात बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, परंतु दैनिक कार्यारंभ बीड दैनिकाचे मुगगाव प्रतिनिधी अशोक राजेंद्र भवर यांनी बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांना धमकावण्यात येऊन त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, हा खोटा गुन्हा मागे घेण्यात येऊन वरिष्ठ स्तरावरून स्वतंत्र कमिटीमार्फत गुणनियंत्रक विभागामार्फत रस्त्याप्रकरणात तपासणी करण्यात येऊन संबधित ठेकेदार-प्रशासकीय आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी दि.26 जुलै रोजी सावरगावघाट (भक्तिगड)येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

पाटोदा पत्रकारांकडुन निषेध,उपविभागीय आधिकारी सुशांत शिंदेंना निवेदन

रस्त्याच्या निकृष्ट रस्त्याप्रकरणात बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल ठेकेदार-प्रशासकीय आधिका-यांनी संगनमताने पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल करणे निषेधार्ह असून अशा दबावाला पत्रकार बळी पडणार नसल्याचे सांगत याविरोधातील लढा आणखी तिव्र केला जाईल असे मराठी पत्रकार परिषद सदस्य हमीदखान पठाण, अशोक भवर, सोमनाथ खंडागळे, संजय सानप, चंद्रकांत पवार, अमोल येवले, भाऊसाहेब पवार, बबन उकांडे, मराठी पत्रकार परिषद संलग्न सोशल मिडीया पाटोदा तालुकाध्यक्ष शेख जावेदभाई, अब्दुल कादर मकरानी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पाटोदा तालुकाध्यक्ष,यावेळी शिवसंग्राचे ता.अध्यक्ष सुशिल तांबे,थोरवे महाराज, चंद्रकांत गिते,यावेळी पाठिंबा आदिनी स्वाक्षरीसह उपविभागीय आधिकारी सुशांत शिंदे यांना निवेदन दिले.

Back to top button