औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

पावसाने उघडीप देताच कपाशीवर मावा,तुडतुड्यांचा प्रादुर्भाव ,१५ हजार ५३३ हेक्टर क्षत्र बाधित

सोयगाव,दि.२४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात ४३ हजार ९९८ लागवडी योग्य क्षेत्रापैकी तब्बल ३० हजार हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आली असून पावसाच्या उघडिपी आणि ढगाळ वातावरणाने तब्बल १५ हजार ५३३ हेक्टरवरील कपाशी पिकांना मावा,तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे.यामुळे खरिपाच्या जोमात असलेल्या कपाशीची पिके संकटात सापडली असून शेतकऱ्यांना फवारणीची चिंता पडली आहे.

सोयगाव तालुक्यात यंदाच्या खरिपाच्या हंगामात कपाशीचा विक्रमी पेरा वाढलेला आहे,कपाशी पाठोपाठ मक्याचाही पेरा वाढला असून मात्र ऐन जोमात आलेल्या कपाशीवर माव्याचा अटॅक आलेला असून यामुळे फवारणीची चिंता वाढलेली आहे.माव्याच्या फवारणीसाठी महागडी कीटकनाशक वापरावी लागत आहे,परंतु तालुका कृषी विभागाकडून यावर उपाय योजनांबाबत कोणतेही मार्गदर्शन होत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे.माव्याचा प्रादुर्भाव अचानक वाढला असून प्रत्येक कपाशीच्या झाडावर माव्याचे प्रमाण अधिक आढळून आले आहे.माव्यामुळे जोमात असलेली कपाशीचे शेंडे व पाने आकसून जात असल्याने कपाशीच्या वाढीसाठी ताण पडत असल्याचे बाधित शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

माव्यासोबतच चिकटा रोग-

कोरडवाहू क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांवर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असून माव्यासोबातच चिकटा वाढल्याने दुहेरी संकटात कपाशी उत्पादक शेतकरी सापडले असून मावा आणि चीकट्यावर उपाय योजनांसाठी व फवारणीच्या औषधांसाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.

तालुका कृषी विभाग बदल्यांमध्ये व्यस्त-

एकीकडे शेतकरी संकटात सापडला असतांना दुसरीकडे मात्र तालुका कृषी विभाग मात्र जिल्हा आणि आंतर बदल्यांच्या प्रक्रियेत व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी कृषी विभागाकडे वेळ नसल्याचे आढळून येत आहे.

फुलपात्यावर आलेली कपाशी वर ऐन जोमात मावा आणि चीकट्याचा प[रादुर्भाव झालेला असल्याने कपाशी पिकांची फुलगळ वाढण्याचा धोका निर्माण झालेला असून फुलगळ मुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Back to top button