तहसिलदार गटविकास अधिकारी आता तरी सुधरा कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश द्या नसता पाटोद्यात होणार मोठा अनर्थ
पाटोदा:नानासाहेब डिडुळ―सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचा जीआर असताना शासनाच्या जीआर ची खिल्ली उडवत पाटोदा तालुक्यातील तहसिल,बांधकाम विभाग, ग्रामसेवक,कृषी विभाग,शिक्षक,नगर पंचायत समिती कर्मचारी,तलाठी तालुक्याच्या ठिकाणी न थांबता कोणी बीड तर कोणी नगर आष्टी वरून ये- जा करत असल्यामुळे पाटोदा तालुक्यातील ऑफिस मध्ये कर्मचारी व अधिकारी नसल्यामुळे ग्रामीण भागातुन आलेल्या नागरिकांचे शासकीय कामे सहा सहा महिने होत तर नाहीच मात्र कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा दिवसें न दिवस वाढू लागली आहे जिल्ह्यातील काही गावात तर रुग्ण संख्या जास्त असून काही रुग्ण दगावले आहेत यामुळे शासकीय कर्मचारी व ग्रामसेवक तलाठी हे सतत फिरत असतात व त्यांचा अनेक लोकांशी मोठा संपर्क होत आहे यामुळे पाटोदा तालुक्यात कोरोनाचा स्फोट होऊ शकतो? यामुळे आवो- जावो घर तुम्हारा असे काम काज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व ग्रामसेवक तलाठ्याना तात्काळ तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी मुख्यालयी थांबण्याचे आदेश द्यावे नसता पाटोदा तालुक्यात मोठा अनर्थ होईल यामुळे पाटोदा तालुक्यात कोरोनाचा स्फोट होऊ नये म्हणून आवो जावो करणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश तहसीलदार रमेश मुंड़लोम यांनी देऊन पाटोदा तालुक्यातील अनर्थ टाळावा.