पाशाभाई पटेल यांचा चुंभळी फाटा येथे बांबु लागवडी साठी शेतकर्याशी संवाद

Last Updated by संपादक

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― महाराष्ट्र राज्याचे कृषीमुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी आपली बीड़ येथील पञकार परीषद घेतल्या नंतर पुण्याला जाता वेळेस चुंभळी फाटा येथे थांबुन शेतकर्याशी बांबु लागवड़ी साठी शेतकर्याशी संवाद साधला.

आपल्या संवादा मध्ये एक वर्षा नंतर परळी येथील थर्मल ला दगड़ी कोळसा ऐवजी बांबु लागणार आहेत तरी शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात बांबु लागवड़ करणे गरजेचे आहे .एक एकरी दोन लाख रूपये मिळतील तसेच लागवड़ी साठी जमीनी मध्ये तीन फुट माती असणे गरजेचे आहे माती कमी असेल तर JCB द्वारे चर खांदुन ट्रिप ने पाणी द्यावे . नानाजी देशमुख योजना (पोखरा) अंतर्गत हेक्टरी पाच लक्ष मिळतील पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांच्या कड़े जाऊन रोजगार हमी योजना अंतर्गत लागवड़ करता येते.चुंभळी फाटा येथे बांबु ने बनवलेले तलप हाॅटेल याची पण प्रशंशा केली व भेट दिली.

या वेळी ऋषीकेश सोनवणे , नरहरी पवळ (सामाजिक कार्यकर्ते ) गुलाबराव कोल्हे ,पाटील पवळ (फौजी ) ,दगड़ू सातपुते ,आण्णासाहेब शिंदे, विकास मुळीक, मोतीराम ड़िड़ूळ असे मोठ्या प्रमाणात शेतकरी हजर होते.